Amazon च्या जंगलातले पोपट माती खाऊ लागले ? काय नेमके कारण ?

Amazon च्या घनदाट जंगलात एक असा नजारा पाहायला मिळत आहे. ज्याला पाहून सर्वजण हैराण झाले आहे. शेकडो रंगीबिरंगी पोपट सध्या नदीच्या किनारी एकत्र होऊन तेथील वाळूचा आस्वाद घेत आहेत. सर्वसाधारणपणे पक्ष्यांना फळे, बिया, फुल आणि छोटे किटक खाताना पाहिले जाते. पोपट तर फळांसोबत झाडांची फुले देखील खात असतात. मात्र अशा प्रकारे वाळू आणि माती खातानाचे दृश्य वेगळे वाटत आहे. काय आहे या मागचे कारण ?

| Updated on: Nov 28, 2026 | 6:26 PM
1 / 6
 पक्षी फळे किंवा किटक खातात मात्र ते अचानक माती किंवा वाळू कसे काय खाऊ लागलेत असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. कारण पक्षाच्या वर्तनाला  जियोफॅगी (Geophagy)म्हटले जाते.

पक्षी फळे किंवा किटक खातात मात्र ते अचानक माती किंवा वाळू कसे काय खाऊ लागलेत असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. कारण पक्षाच्या वर्तनाला जियोफॅगी (Geophagy)म्हटले जाते.

2 / 6

माती खाणे ही पक्ष्यांची किंवा कोणत्याही सजीवाची नैसर्गिक सवय आहे. हे पक्षी भूक लागलीय म्हणून वाळू खात नाहीएत तर पक्ष्यांच्या या वर्तनाला जियोफॅगी (Geophagy)म्हटले जाते.

3 / 6

केवळ अन्नाच्या शोधासाठी पक्षी फिरत नसतात तर त्यांच्या शरीरात आवश्यक खनिज मुलद्रव्यांची कमतरता पूर्ण करण्यासाठी आणि काही विषारी नैसर्गिक तत्वांचा प्रभाव कमी करण्याच्या त्यांचे हे विचित्र वागणे जबाबदार आहे.

4 / 6

जियोफॅगीचा अर्थ माती किंवा चिकन मातीचे जाणून बुजून सेवन करणे होय.ही प्रवृत्ती केवळ पोपटांपर्यंत मर्यादित नाही. जगातील अनेक सजीव नैसर्गिक रुपाने माती खात असतात. अमेझॉनचे पोपट विशेष रुपाने नदीच्या किनाऱ्यावरील उपलब्ध माती खाण्यासाठी पोहचतात. या जागांना क्ले लिक्स (Clay Licks) म्हटले जाते.

5 / 6

पोपटांसाठी मातीचे जेवण त्यांच्या सामान्य अन्नाचा पर्याय नसून त्यांच्या आहाराला संतुलित करण्याची पद्धत आहे. जंगलात त्यांना फळे, बिया, पाने आणि फुलापासून मिळणारे अन्न मिळते.

6 / 6

या अन्नात अनेक पोषक तत्वं असतात. मात्र, तरीही त्यांना पुरेशा प्रमाणात खनिज मुलद्रव्ये मिळत नाहीत. त्यामुळे अशा वेळी ही माती त्यांच्या शरीरातील खनिजांची गरज भागवण्यासाठी उपयोगी पडते.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us