
झिम्बाब्वे : Okun's Misery Index नुसार, झिम्बाब्वे हा जगातील सर्वात दुःखी देश आहे. या देशात प्रचंड महागाई आहे. वाढत्या बेरोजगारीमुळे लोक संकटात सापडलेले आहेत.

दक्षिण आफ्रिका : या यादीत दक्षिण आफ्रिका दुसऱ्या क्रमांकावर आहे. या देशात विक्रमी बेरोजगारी आहे. सतत वीजपुरवठा खंडित होत असतो. तसेच देशातील वाढती आर्थिक असमानता यामुळे जनता त्रस्त झाली आहे.

यमन : येमेनमधील लोक गृहयुद्धामुळे त्रस्त आहेत. यामुळे देशाची अर्थव्यवस्था संकटात सापडली आहे. भूक आणि बेरोजगारीने संकट आणखी वाढले आहे.

व्हेनेझुएला : व्हेनेझुएलाचाही या यादीत समावेश आहे. वेगाने वाढणारी महागाई, आर्थिक संकट आणि जीवनावश्यक वस्तूंच्या तीव्र टंचाईमुळे नागरिक त्रस्त आहेत.

श्रीलंका : भारताच्या शेजारील श्रीलंका या देशाचाही या यादीत समावेश आहे. हा देश आर्थिक दिवाळखोरीतून पूर्णपणे सावरलेला नाही. या देशात महागाई, इंधन टंचाई आणि बेरोजगारी या समस्या आहेत.