GK: D-Martचा फूल फॉर्म काय आहे? 99 टक्के लोकांना माहिती नसेल

आजकाल राशन भरण्यासाठी अनेकजण डी-मार्टमध्ये जातात. कारण डी-मार्टमध्ये सर्व वस्तू आणि एकाच छताखाली मिळतात. पण तुम्हाला डीमार्टचा फूल फॉर्म माहिती आहे का?

| Updated on: Jan 12, 2026 | 3:24 PM
1 / 5
सर्वसामान्यांच्या खिशाला परवडणारे सर्व सामान हे डीमार्ट (DMart) येथे मिळते. अनेकजण महिन्याच्या शेवटी किंवा सणासुधीच्या आधी डीमार्टमध्ये जाऊन सामान भरतात. त्यामुळे डीमार्ट म्हटले की सर्वांच्या तोंडात पहिले स्वस्त दरात मिळणारे सामानाचे दुकान हे वाक्य येते. पण तुम्हाला या इतक्या प्रसिद्ध डीमार्टचा फूल फॉर्म काय आहे माहिती आहे का? 99 टक्के लोकांना नक्कीच माहिती नसेल.

2 / 5
डीमार्टचे मालक राधाकिशन दमानी हे आहेत. त्यांनी गरीबांना अगदी कमी दरात सामान मिळवून देण्याच्या हेतून पहिले डीमार्ट सुरु केले होते. या डीमार्टला मिळालेल्या यशानंतर हळूहळू एक एक ब्रांच वाढवण्यात आली होती.

3 / 5
राधाकिशन दमानी यांनी २००२ मध्ये मुंबईतील पवई येथे पहिले डीमार्ट स्टोअर सुरू केले. त्यांचा मुख्य उद्देश होता की भारतीय कुटुंबांच्या गरजा लक्षात घेऊन दर्जेदार वस्तू कमी किंमतीत उपलब्ध करून देणे. आज डीमार्ट Avenue Supermarts Limited (ASL) या कंपनीच्या अंतर्गत चालते, ज्याचे मुख्यालय मुंबईत आहे. कंपनीकडे डीमार्ट, डीमार्ट मिनिमॅक्स, डीमार्ट प्रेमिया इत्यादी ब्रँड्स आहेत.

4 / 5
डीमार्टचा फुल फॉर्म आहे 'दमानी मार्ट' (Damani Mart). हे नाव त्याचे संस्थापक राधाकिशन दमानी यांच्या आडनावावरून (Damani) ठेवण्यात आले आहे. सुरुवातीला 'दमानी मार्ट' असे नाव ठेवण्यात आले होते. नंतर ते लोकप्रियतेसाठी साधे आणि आकर्षक 'डीमार्ट' असे छोटे केले गेले.

5 / 5
डीमार्टचे यशाचे मुख्य रहस्य म्हणजे कमी नफा मार्जिन, मोठ्या प्रमाणात खरेदी, थेट उत्पादकांकडून माल घेणे आणि अनावश्यक खर्च टाळणे. यामुळे ग्राहकांना नेहमीच 'स्वस्तात मस्त' वस्तू मिळतात. याच धोरणामुळे मध्यमवर्गीय कुटुंबांसाठी डीमार्ट हे आवडते ठिकाण बनले आहे.