
महाराष्ट्राचा राज्य वृक्ष : महाराष्ट्राचा राज्य वृक्ष आंबा आहे. भारतात तसेच जगभरात आंबा फळांचा राजा म्हणून ओळखला जातो. महाराष्ट्रात आंब्याचे सांस्कृतिक, आर्थिक आणि कृषी क्षेत्रात मोठे महत्त्व आहे.

सदाहरित झाड : आंबा हे सदाहरित झाड आहे. याची उंची साधारण 10 ते 40 मीटरपर्यंत वाढू शकते आणि हे झाड शेकडो वर्षे जिवंत राहू शकते.

आंब्याची झाडाची वैशिष्ट्ये : आंब्याची पाने लांब, टोकदार आणि चमकदार हिरवी असतात. तसेच नवीन पाने लालसर किंवा तांबूस रंगाची असतात. आंब्याला गोड आणि रसाळ फळे येतात.

आर्थिक महत्त्व : महाराष्ट्रात आंबा महत्त्वाचे नगदी पीक आहे. आंब्याची मोठ्या प्रमाणावर देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय निर्यात होते. विशेषतः हापूस आंब्यामुळे कोकणातील शेतकऱ्यांना मोठे उत्पन्न मिळते

सांस्कृतिक आणि धार्मिक महत्त्व : भारतीय संस्कृतीत आंब्याला पवित्र मानले जाते. सण-समारंभात आंब्याच्या पानांचे तोरण लावले जाते. धार्मिक विधींमध्ये आंब्याची पाने वापरली जातात. विवाह व शुभकार्यांमध्ये आंब्याला शुभ प्रतीक मानले जाते