AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sunil Anand Passes Away: देव आनंद यांच्या मुलाचं निधन, ज्या रुग्णालयात वडिलाने घेतला अखेरचा श्वास तिथेच मृत्यू

Sunil Anand Passes Away: हिंदी सिनेमातील दिग्गज अभिनेते दिवंगत देव आनंद यांचा मुलगा सुनील आनंद यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे. त्यांनी लंडन येथील रुग्णालयात शेवटचा श्वास घेतला.

Sunil Anand Passes Away: देव आनंद यांच्या मुलाचं निधन, ज्या रुग्णालयात वडिलाने घेतला अखेरचा श्वास तिथेच मृत्यू
| Updated on: Jul 28, 2026 | 4:45 PM
Share

हिंदी सिनेमातील दिग्गज अभिनेते दिवंगत देव आनंद यांचा मुलगा सुनील आनंद यांचे निधन झाले आहे. अचानक प्रकृती खालावल्यामुळे त्यांना सोमवारी सकाळी लंडनमधील एका रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. त्यानंतर हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांचे निधन झाले. उल्लेखनीय बाब म्हणजे, याच रुग्णालयात २०११ मध्ये देव आनंद यांनीही अखेरचा श्वास घेतला होता. आता सुनील यांनी देखील याच रुग्णालयात शेवटचा श्वास घेतला. सुनील आनंद यांच्या जाण्याने बॉलिवूडमध्ये शोक व्यक्त केला जात आहे.

पुतणीने दिली निधनाची माहिती

सुनील आनंद यांची पुतणी जीना नारंग यांनी याबाबत माहिती दिली आहे. ‘सुनील आनंद यांच्या निधनामुळे आमचे कुटुंब अत्यंत दुःखात आहे. आम्हाला मिळणारे प्रेम, प्रार्थना आणि पाठिंबा यामुळे आम्हाला दिलासा मिळत आहे आणि त्याबद्दल आम्ही अत्यंत कृतज्ञ आहोत. या कठीण काळातून जात असताना कृपया आमच्या गोपनीयतेचा आदर करावा, ही नम्र विनंती.’

View this post on Instagram

A post shared by Lipika Varma (@lipikavarma)

प्रसिद्ध लेखिका अनीता पद्दा यांनी या बातमीची पुष्टी केली आहे. अनीता यांनी सांगितले की, सुनील आनंद यांचे आज सकाळी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. कुटुंबात ते एकटेच होते आणि वडील देव आनंद यांच्या निधनानंतर ते लंडनला स्थायिक झाले होते. सध्या त्यांच्या कुटुंबियांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करत केला जात आहे. ही अत्यंत दुःखद बातमी आहे.

सुनील आनंद यांचे कुटुंब

सुनील आनंद यांचा जन्म देव आनंद आणि अभिनेत्री कल्पना कार्तिक यांच्या घरी झाला होता. लहानपणापासूनच ते चित्रपट वातावरणात वाढले आणि हिंदी सिनेमातील अनेक मोठ्या नावांशी त्यांचा संबंध होता. त्यांचे काका चेतन आनंद आणि विजय आनंद हे हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध दिग्दर्शक होते. याशिवाय त्यांच्या नातेवाईकांमध्ये दिग्दर्शक केतन आनंद, विवेक आनंद, अभिनेते-दिग्दर्शक शेखर कपूर, नीलू आणि अरुणा अशी नावे आहेत. नीलू यांचा विवाह अभिनेते नवीन निश्चल यांच्याशी झाला होता, तर अरुणा यांचा विवाह दिग्गज अभिनेते बलराज साहनी यांच्या मुलाशी परीक्षित साहनी यांच्याशी झाला होता.

अभिनयात क्षेत्रात वडिलांसारखे यश मिळाले नाही

सुनील आनंद यांनी अमेरिकेतील अमेरिकन युनिव्हर्सिटी, वॉशिंग्टन डीसी येथून बिझनेस अॅडमिनिस्ट्रेशनची पदवी घेतली होती. शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी आपल्या वडील देव आनंद यांच्याप्रमाणे चित्रपटसृष्टीत पदार्पण करण्याचा निर्णय घेतला. १९८४ मध्ये त्यांनी ‘आनंद और आनंद’ या चित्रपटातून अभिनेता म्हणून पदार्पण केले. या चित्रपटात त्यांच्यासोबत राखी, स्मिता पाटील आणि बिस्वजित चॅटर्जी यांच्यासारखे कलाकारही होते. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरला. पदार्पणाच्या चित्रपटानंतर सुनील यांनी ‘कार थीफ’, ‘मैं तेरे लिए’ आणि ‘मास्टर’ यांसारख्या चित्रपटांत काम केले. मात्र ते आपल्या वडील देव आनंद यांच्यासारखी लोकप्रियता मिळवू शकले नाहीत.

Follow Us
नागपुरातील OYO हॉटेल्सवर आता पोलिसांची करडी नजर!
Chandrashekhar Bawankule | नागपुरातील OYO हॉटेल्सवर आता पोलिसांची करडी नजर! चंद्रशेखर बावनकुळेंनी जाहीर केले कठोर नियम, संपूर्ण व्हिडिओ पहा
मागण्या कोणत्याही परिस्थितीत मान्य होणार नाहीत; सदावर्तेंचा इशारा
Gunaratna Sadavarte on Manoj Jarange | मागण्या कोणत्याही परिस्थितीत मान्य होणार नाहीत; गुणरत्न सदावर्तेंचा जरांगे पाटलांना थेट इशारा
भरधाव कारने घेतला सॉफ्टवेअर इंजिनियरचा जीव! अपघातग्रस्त कारमधूनच...
Pune | भरधाव कारने घेतला सॉफ्टवेअर इंजिनियरचा जीव! अपघातग्रस्त कारमधूनच रुग्णालयात नेलं, पण...
जरांगेंचं उपोषण ढोंगीपणाचं! अजय बारस्करांचा घणाघात; सगेसोयरे अन्...
Ajay Baraskar | जरांगेंचं उपोषण ढोंगीपणाचं! अजय बारस्करांचा घणाघात; सगेसोयरे अन् हैदराबाद गॅझेटच्या नावाखाली समाजाची दिशाभूल
आदिवासी विद्यार्थ्यांचा सरकारविरोधात एल्गार! 28 सप्टेंबरला नाशिकहून...
Nashik Protest | आदिवासी विद्यार्थ्यांचा सरकारविरोधात एल्गार! 28 सप्टेंबरला नाशिकहून मुंबईकडे लॉंग मार्च; 5 ऑक्टोबरला मुंबईत धडक
माधुरी हत्तीणीने स्विमिंग टँकमध्ये उतरताच मनसोक्त लुटला पोहण्याचा आनंद
Madhuri Elephant | माधुरी हत्तीणीने स्विमिंग टँकमध्ये उतरताच मनसोक्त लुटला पोहण्याचा आनंद; दृश्यांनी जिंकली सर्वांची मनं
शेतकऱ्यांसाठी बातमी! दुष्काळसदृश स्थितीचा सरकार घेणार ग्राऊंड रिपोर्ट
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! दुष्काळसदृश स्थितीचा सरकार घेणार ग्राऊंड रिपोर्ट; पालकमंत्री जिल्ह्याजिल्ह्यात दौरा करणार
पहाटे 4 वाजेपर्यंत खलबतं अन् अखेर BRICSमध्ये सहमती! सर्व सदस्य देशांचं
BRICS Summit 2026 | पहाटे 4 वाजेपर्यंत खलबतं अन् अखेर BRICSमध्ये सहमती! सर्व सदस्य देशांचं संयुक्त निवेदन मंजूर
माझा भाऊ शांततेनेच काम करेल अशी अपेक्षा! अमृता फडणवीसांचं मोठं वक्तव्य
Amruta Fadnavis on Manoj Jarange | माझा भाऊ शांततेनेच काम करेल अशी अपेक्षा! मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनावर अमृता फडणवीसांचं मोठं वक्तव्य, पुढे म्हणाल्या...
हुकूमशाही आणि दडपशाहीने बुलढाणा चालणार नाही! संजय गायकवाडांच्या टीकेवर
Shweta Mahale on Sanjay Gaikwad | हुकूमशाही आणि दडपशाहीने बुलढाणा चालणार नाही! संजय गायकवाडांच्या टीकेवर श्वेता महालेंचा जोरदार पलटवार