GK : भारतातील कोणत्या नदीवर सर्वात जास्त धरणे आहेत?

River GK : भारतात शेकडो लहान-मोठ्या नद्या आहेत. यातील जवळपास सर्वच नद्यांवर मोठी धरणे आहेत या धरणांचा मुख्य उद्देश पूर नियंत्रण, सिंचन आणि वीज निर्मिती हा आहे. भारतातील सर्वाधिक धरणे असलेल्या नद्यांची माहिती जाणून घेऊयात.

| Updated on: Jan 17, 2026 | 11:31 PM
1 / 5
कावेरी आणि नर्मदा : कावेरी आणि नर्मदा नदीवर सर्वात जास्त धरणे आहेत. नर्मदा नदीवर सरदार सरोवर, इंदिरा सागर आणि ओंकारेश्वर यांसारखी मोठी आणि महत्त्वाची धरणे आहेत. याशिवाय या नदीवर अनेक लहान धरणेदेखील बांधण्यात आली आहेत.

2 / 5
कावेरी नदी आणि ऐतिहासिक धरण: कावेरी नदीवर मेट्टूर, कृष्णराज सागर (KRS) आणि शिवनसमुद्र ही प्रमुख धरणे आहेत. विशेष म्हणजे, तमिळनाडूमध्ये याच नदीवर जगातील सर्वात जुन्या धरणांपैकी एक असलेले 'कल्लनई धरण' स्थित आहे.

3 / 5
नदीचा उगम आणि विस्तार: कावेरी नदीचा उगम कर्नाटक राज्यातील कोडागु (कूर्ग) जिल्ह्यातील ब्रह्मगिरी पर्वत रांगांमधील 'तलाकावेरी' येथून होतो. कर्नाटक आणि तमिळनाडू राज्यांमधून वाहत ही नदी पुढे बंगालच्या उपसागराला जाऊन मिळते.

4 / 5
दक्षिण भारताची जीवनवाहिनी: कावेरी नदीला दक्षिण भारताची 'कृषी जीवनरेखा' मानले जाते. या नदीच्या काठावर अत्यंत सुपीक मैदाने असून, विशेषतः तमिळनाडूचा कावेरी डेल्टा हा राज्यातील सर्वात समृद्ध कृषी विभाग आहे.

5 / 5
धार्मिक आणि आर्थिक महत्त्व: कावेरी ही दक्षिण भारतातील प्रमुख नद्यांपैकी एक असून ती धार्मिक आणि आर्थिक दोन्ही दृष्टीकोनातून अत्यंत महत्त्वाची मानली जाते. सुमारे १४६५ किमी लांबीचा विस्तार असलेल्या या नदीला देशातील महत्त्वाच्या जलस्त्रोतांपैकी एक मानले जाते.