
मानव सामाजिक प्राणी आहेत, त्याचप्रमाणे मुंग्या देखील सामाजिक कीटक आहेत. म्हणजेच त्या मानवांप्रमाणेच इतर मुंग्याप्रमाणे एकत्रित राहतात. त्यामुळे अनेकदा त्या एखादी शिकार करताना एकत्र दिसतात.

मुंग्या प्रत्येक काम एका विशिष्ट व्यवस्थेनुसार करतात. त्या एकत्रित अन्न शोधतात, किंवा आपल्या भागाचे रक्षण करता. तुम्ही हे पाहिले असेल की, जेव्हा एखादी मुंगी मरते तेव्हा इतर मुंग्या तिच्याभोवती जमतात.

मुंग्या असे का करतात? किंवा त्यांना कसे कळते की एखादी सहकारी मुंगी कधी मेली आहे? आज आपण या सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घेणार आहोत.

मुंग्या एकमेकांशी संवाद साधण्यासाठी रासायनिक सिग्नल वापरतात. या रसायनाला फेरोमोन म्हणतात. जेव्हा मुंगी जिवंत असते तेव्हा ती सतत फेरोमोन रसायन बाहेर टाकते.

जेव्हा मुंगी मरते तेव्हा मुंगीचे शरीर ओलेइक अॅसिड नावाचा एक वेगळा रासायनिक सिग्नल सोडू लागते. त्यामुळे इतर मुंग्यांना कळते की सहकारी मुंगीचा मृत्यू झाला आहे. त्यानंतर तिच्यापाशी जमतात आणि आपला भाग स्वच्छ ठेवण्यासाठी मृत मुंगीला परिसरातून बाहेर काढतात.