Todays Gold Rate: पुन्हा सोन्याच्या भावात वाढ! आज 10 ग्रॅम सोन्यासाठी…

Todays Gold Rate: गेल्या काही दिवसांपासून सोने आणि चांदीचे भाव हे अस्थिर असल्याचे पाहायला मिळत आहे. आज सोन्याच्या भावात पुन्हा वाढ झाली आहे. त्यामुळे 10 ग्रॅम सोन्यासाठी किती रुपये मोजावे लागणार जाणून घ्या...

| Updated on: Apr 30, 2026 | 3:40 PM
1 / 5
मिडलमध्ये अमेरिका आणि इराणमध्ये सुरु असलेल्या युद्धाचा परिणाम सोने आणि चांदीच्या भावावर मोठ्या प्रमाणात झाला होता. आता या युद्धाला पूर्णविराम लागल्यानंतर जळगावच्या सराफ बाजारात सोने आणि चांदीचे दर घसरले होते. मात्र, आज पुन्हा एकदा सोने आणि चांदीच्या दरात वाढ झाली आहे.

2 / 5

जळगावच्या सराफ बाजारात आज सोन्या आणि चांदीच्या दरात वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे पुन्हा एकदा सोने खरेदी करताना विचार करावा लागणार आहे.

3 / 5

आज जळगावच्या सराफ बाजारात सोन्याचे दर 700 रुपयांनी वाढले आहेत. तर चांदीचे दर हे 3 हजार रुपयांनी वाढले आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांना सोने खरेदी करताना दहा वेळा विचार करावा लागणार आहे.

4 / 5

10 ग्रॅम सोन्यासाठी आज जीएसटीसह 1 लाख 53 हजार 676 रुपये मोजावे लागणार आहेत. तर चांदीचे दर जीएसटीसह 2 लाख 51 हजार 320 रुपये द्यावे लागणार आहेत.

5 / 5

(टीप- वरच्या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. या लेखाच्या माध्यमातून गुंतवणूक करण्याचा सल्ला दिलेला नाही. कुठेही प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष गुंतवणूक करायची असेल किंवा कोणताही आर्थिक निर्णय घ्यायचा असेल तर त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्या)

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us