Todays Gold Rate: आता खरेदी करणे शक्यच नाही! सोन्याचा दर पाहून सर्वसामान्यांना फुटेल घाम, आज 10 ग्रॅमचा भाव…

Todays Gold Rate: सराफ बाजारातील सोने आणि चांदीचे दर हे अस्थिर असल्याचे पाहायला मिळत आहे. आज सोन्याच्या भावत झालेली वाढ पाहून सर्वसमान्यांना घाम फुटेल. जाणून घ्या आजचा भाव...

| Updated on: Mar 28, 2026 | 4:03 PM
1 / 6
सोने हे सर्वात मौल्यवान धातू म्हणून ओळखले जाते. हा धातू खरेदी करणे आजकाल सर्वसामान्यांसाठी कठीण होऊन बसले आहे. जळगावच्या सराफ बाजारात देखील सोने आणि चांदीचे दर हे अस्थिर असल्याचे दिसत आहे.

सोने हे सर्वात मौल्यवान धातू म्हणून ओळखले जाते. हा धातू खरेदी करणे आजकाल सर्वसामान्यांसाठी कठीण होऊन बसले आहे. जळगावच्या सराफ बाजारात देखील सोने आणि चांदीचे दर हे अस्थिर असल्याचे दिसत आहे.

2 / 6

आज जळगावच्या सराफ बाजारात सोन्या आणि चांदीच्या दरात मोठी वाढ झाली आहे. महिनाभरापासून प्रचंड घसरण होत असलेल्या सोन्या आणि चांदीच्या दरात गेल्या सहा दिवसात मोठी वाढ झाली आहे.

3 / 6

अवघ्या सहा दिवसात सोन्याच्या दरात तब्बल 11 हजार 500 रुपयांची वाढ झाली असून पुन्हा दीड लाखांचा आकडा गाठला.

4 / 6

आज, 28 मार्च रोजी सोन्याच्या दरात तब्बल 2 हजार 600 रुपयांची वाढ झाली आहे. तर चांदीच्या दरात 3 हजार रूपयांची वाढ झाली आहे. सोन्याचे दर जीएसटीसह 1 लाख 50 हजार 380 रुपये प्रति तोळ्यावर पोहोचले आहेत. तर चांदीचे दर जीएसटीसह 2 लाख 39 हजार 990 रुपयांवर आले आहेत.

5 / 6

अनेक दिवसांपासून सतत घसरण होत असलेल्या सोन्या - चांदीच्या दरात वाढ होत असल्यामुळे चिंतेत असलेल्या गुंतवणूकदारांना दिलासा आहे. पुढच्या काळात आणखीन भाव वाढू शकतात यामुळे सराफ बाजारात सोना चांदी खरेदी करण्यासाठी ग्राहकांची गर्दी वाढली आहे.

6 / 6

(टीप- वरच्या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. या लेखाच्या माध्यमातून गुंतवणूक करण्याचा सल्ला दिलेला नाही. कुठेही प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष गुंतवणूक करायची असेल किंवा कोणताही आर्थिक निर्णय घ्यायचा असेल तर त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्या)

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us