बापरे! सोन्याचा भाव झटक्यात 11 हजारांनी वाढला, एका तोळ्यासाठी तब्बल…खिसा होणार रिकामा!

सोने आणि चांदीच्या भावात चांगलीच वाढ होताना पाहायला मिळत आहे. सोन्याचा दरात दोन दिवसांत तब्बल अकरा हजार रुपयांनी वाढ झालेली आहे. त्यामुळे भविष्यात नेमकं काय होणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

| Updated on: Dec 23, 2025 | 3:38 PM
1 / 5
गेल्या अनेक दिवसांपासून सोने आणि चांदीच्या दरात चढउतार झालेला पाहायला मिळत आहे. सोन्याचा भाव तर गेल्या अनेक दिवसांपासून वाढत असलेला पाहायला मिळतो आहे. जळगावच्या सराफा बाजारात सलग दुसऱ्या दिवशी सोन्या आणि चांदीच्या दरात विक्रमी वाढ झालेली आहे.

2 / 5
मिळालेल्या माहितीनुसार सोन्याच्या दरात 2 हजार 700 रुपयांची वाढ झाली आहे. तर चांदीच्या दरात तब्बल 5 हजार रुपयांची वाढ झालेली पाहायला मिळाले. या भाववाढीनंतर सोन्याच्या दर जीएसटीसह सह 1 लाख 40 हजार  80 रुपये प्रती 10 ग्रॅम तर चांदीचा दर जीएसटीसह 2 लाख 16 हजार 300 रूपये प्रति एक किलो या विक्रमी उच्चांकीवर पोहोचला आहे.

3 / 5
गेल्या दोन महिन्यांत सोन्याच्या दरात 11 हजार 500 रुपये तर चांदीच्या दरात तब्बल 50 हजार रुपयांनी वाढ झाली आहे. जागतिक घडामोडींच्या पार्श्वभूमीवर सोने तसेच चांदीची खरेदी तसेच गुंतवणूक वाढली आहे.  त्याचाच परिणाम सोने आणि चांदीच्या दरावर झाल्याचा सराफ व्यावसायिक सांगत आहेत.

4 / 5
सोन्याने चांदीचे दर प्रचंड वाढल्याने त्याचा परिणाम ग्राहकांवर देखील झाला आहे. ग्राहकांचे बजेट कोलमडले असून दागिने खरेदी करण्याची इच्छा लांबवणीवर पडली आहे. अनेक महिला आता सोने, चांदीचे दागिने न वापरता बेन्टेक्सचे दागिने खरेदी करताना दिसत आहे.

5 / 5
दरम्यान, सध्या सोन्याचा भाव प्रचंड वाढत असल्याने भविष्यात या मौल्यवान धातूचे नेमके काय होणार? असे विचारले जात आहे. (टीप- या स्टोरीच्या माध्यमातून गुंतवणुकीचा सल्ला देण्यात आलेला नाही. गुंतवणूक करताना तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्या.)