Gold Silver Price Today: दिवाळी संपताच सोन्याचे दर घसरले, चांदीच्या दरातही बदल; सराफा बाजारात मोठी उलथापालथ
Gold Silver Price Today: दसरा-दिवाळीचा सण संपला असून सोनं खरेदीचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. सराफा बाजारात सोन्याच्या दरात घसरण झाली असून दहा ग्रॅम सोन्याचा नवा भाव किती आहे, ते जाणून घ्या..

Gold Silver Price Today: दिवाळीचा सण संपताच सोने-चांदी खरेदी करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. गेल्या काही दिवसांपासून सोन्या-चांदीच्या दरात सुरू असलेली चढ-उताराची मालिका कायम आहे. गुरुवार, 12 नोव्हेंबर रोजी सोन्याच्या दरात घसरण झाली असून चांदीच्या किमतीतही बदल पाहायला मिळत आहे. त्यामुळे लग्नसराईसाठी दागिन्यांची खरेदी करण्याचा विचार करणाऱ्या ग्राहकांचं लक्ष आता सराफा बाजारातील दरांकडे लागलं आहे.
12 नोव्हेंबर रोजी भारतात 24 कॅरेट सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम 1 लाख 40 हजार 280 रुपये इतका नोंदवण्यात आला. तर 22 कॅरेट सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम 1 लाख 28 हजार 590 रुपये होता. शहरानुसार सोन्याचे दर पाहायचे झाल्यास मुंबईत 24 कॅरेट सोन्याचा भाव 1 लाख 40 हजार 20 रुपये, तर 22 कॅरेट सोन्याचा भाव 1 लाख 28 हजार 352 रुपये प्रति 10 ग्रॅम होता. दिल्लीत 24 कॅरेट सोनं 1 लाख 39 हजार 780 रुपये आणि 22 कॅरेट सोनं 1 लाख 28 हजार 132 रुपये इतकं होतं.
चेन्नईमध्ये 24 कॅरेट सोन्याचा भाव 1 लाख 40 हजार 430 रुपये, तर 22 कॅरेट सोन्याचा भाव 1 लाख 28 हजार 728 रुपये होता. कोलकातामध्ये हे दर अनुक्रमे 1 लाख 39 हजार 840 रुपये आणि 1 लाख 28 हजार 187 रुपये होते. बंगळुरूमध्ये 24 कॅरेट सोनं 1 लाख 40 हजार 130 रुपये, तर 22 कॅरेट सोनं 1 लाख 28 हजार 453 रुपये प्रति 10 ग्रॅम होतं.
सोन्याप्रमाणेच चांदीच्या किमतीतही चढ-उतार पाहायला मिळत आहेत. 12 नोव्हेंबर रोजी भारतात 999 शुद्धतेच्या चांदीचा दर प्रति किलो 1 लाख 85 हजार 340 रुपये आहे. मुंबईत चांदीचा भाव 1 लाख 85 हजार 10 रुपये, तर दिल्लीत 1 लाख 84 हजार 690 रुपये होता. चेन्नईमध्ये चांदीचा दर 1 लाख 84 हजार 760 रुपये, कोलकात्यात 1 लाख 82 हजार 510 रुपये आणि बंगळुरूमध्ये 1 लाख 85 हजार 150 रुपये प्रति किलो होता.
सोन्या-चांदीच्या दरातील घसरणीमागे आंतरराष्ट्रीय बाजारातील घडामोडी महत्त्वाच्या ठरत आहेत. अमेरिकन डॉलर मजबूत झाल्याने आणि व्याजदरात आणखी वाढ होण्याची शक्यता निर्माण झाल्याने मौल्यवान धातूंवर दबाव आला आहे.
दरम्यान, सोन्या-चांदीचे दर खरेदीच्या वेळी बदलू शकतात. दागिन्यांच्या अंतिम किमतीमध्ये जीएसटी आणि मेकिंग चार्जेसची भर पडते. त्यामुळे प्रत्यक्ष खरेदी करण्यापूर्वी स्थानिक सराफा बाजारातील दर तपासून घेणं महत्त्वाचं आहे.