Todays Gold Rate: आनंदाची बातमी! सोन्याच्या दरात घसरण, आज 10 ग्रॅमसाठी…
Todays Gold Rate: गेल्या काही दिवसांपासून सोने आणि चांदीचे भाव अस्थिर असल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे आज 12 ऑक्टोबर रोजी सोन्याच्या भावात घसरण झाल्याचे चित्र आहे.

भारतीय संस्कृतीमध्ये सोने आणि चांदी या दोन्ही मौल्यवान धातूंना प्रचंड महत्त्व दिले जाते. शुभकार्याच्या वेळी अनेकांचा कल हा सोने खरेदीकडे असतो. पण गेल्या काही दिवसांपासून सतत वाढत असलेले दर पाहून सर्वसामान्यांना सोने खरेदी करावे की नाही? असा प्रश्न पडला आहे. पण आजचा दिवस हा सोने खरेदी करण्यासाठी चांगला दिवस आहे. चला जाणून घेऊया आजचा भाव किती?
आज जळगावच्या सराफ बाजारात सोन्याचे दर घसरले आहेत. तर चांदीचे दर स्थिर असल्याचे चित्र आहे.
12 ऑक्टोबर रोजी सोन्याच्या दरात १ हजार ३०० रुपयांची घसरण झाली आहे. त्यामुळे 10 ग्रॅम सोन्याचे दर जीएसटीसह 1 लाख 52 हजार 955 रुपयांवर पोहोचले आहेत.
तर दुसरीकडे एक किलो चांदीचे दर हे स्थिर आहेत. त्यामुळे चांदीचे दर जीएसटीसह 2 लाख 31 हजार 750 रूपयांवर पोहोचले आहेत.
(Disclaimer: वरच्या लेखातील माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. आम्ही या माहितीची पुष्टी करत नाही किंवा समर्थनही देत नाही. या लेखाच्या माध्यमातून अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा उद्देश नाही.)