Gold Price Prediction : आजच तुमचा सोनार गाठा… बाबा वेंगाची धडकी भरवणारी भविष्यवाणी, सोन्याचा भाव थेट…

Gold Price Prediction : बाबा वांगा यांनी सोन्याच्या भावाबद्दलच्या आपल्या भाकितांनी पुन्हा एकदा जगाला चकित केलं आहे. जर, प्रत्येक वेळीप्रमाणे, त्यांची भाकिते खरी ठरली, तर सर्वसामान्य माणूस सोनं पाहण्यासाठी आतुर होईल.

| Updated on: Apr 30, 2026 | 10:55 AM
1 / 8
भारतात सोनं म्हणजे केवळ दागिना नव्हे तर त्याचं भावनिक मूल्य आहे, तसेच एक प्रतिष्ही असते आणि संकटकाळातील सोबतीचे प्रतीक मानले जाते. इराण-अमेरिका युद्धासह जागतिक बाजारपेठेतील अलीकडील घडामोडींमुळे सोन्याच्या दरात सतत चढुतार होताना दिसतोय. मध्यंतरी सोन्याचे दर खूप वाढले होते. गेल्या वर्षभरात सोन्याच्या किमतीत 80 टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. सध्या सोने आणि चांदीच्या किमतींवर काही प्रमाणात नियंत्रण दिसत असले तरी, बाबा वांगा यांच्या भविष्यवाणीनुसार, नजीकच्या काळात सोन्याच्या किमती पुन्हा वाढू शकतात. (All Photos : Social Media)

भारतात सोनं म्हणजे केवळ दागिना नव्हे तर त्याचं भावनिक मूल्य आहे, तसेच एक प्रतिष्ही असते आणि संकटकाळातील सोबतीचे प्रतीक मानले जाते. इराण-अमेरिका युद्धासह जागतिक बाजारपेठेतील अलीकडील घडामोडींमुळे सोन्याच्या दरात सतत चढुतार होताना दिसतोय. मध्यंतरी सोन्याचे दर खूप वाढले होते. गेल्या वर्षभरात सोन्याच्या किमतीत 80 टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. सध्या सोने आणि चांदीच्या किमतींवर काही प्रमाणात नियंत्रण दिसत असले तरी, बाबा वांगा यांच्या भविष्यवाणीनुसार, नजीकच्या काळात सोन्याच्या किमती पुन्हा वाढू शकतात. (All Photos : Social Media)

2 / 8

'बाल्कन नॉस्ट्राडॅमस' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बाबा वांगा यांनी 2026 सालासाठी काही भविष्यवाणी केली आहे, जी सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. या वर्षी जगभरात एक मोठे आर्थिक संकट येईल आणि बँकिंग व्यवस्था कोलमडून पडू शकते अशी भविष्यवाणी त्यांनी केली आहे. एवढंच नव्हे तर जेव्हा लोकांचा कागदी चलनावरील विश्वास उडेल, तेव्हा सर्वजण सोन्याकडे वळतील. परिणामी, सोन्याची किंमत आपल्या कल्पनेपलीकडे वाढू शकते असंही त्यांनी म्हटलं आहे.

3 / 8

बाबा वांगा यांच्या सांगण्यानुसार, आर्थिक संकटाच्या काळात सोन्याच्या दरात 25 ते 40 टक्क्यांनी वाढ होण्याची शक्यता आहे. जर हा अंदाज खरा ठरला, तर सध्याच्या दरानुसार 10 ग्रॅम सोन्याची किंमत 1.9 लाख ते 2.1 लाख रुपयांपर्यंत पोहोचू शकते. हा आकडा केवळ 2026 मध्येच ओलांडला जाऊ शकतो. हे जरी असंभाव्य वाटत असले, तरी इराण युद्ध आणखी दीर्घकाळ चालल्यास सोन्याच्या दरात मोठी वाढ होऊ शकते, ही शक्यता नाकारता येत नाही.

4 / 8

खरं तर, जेव्हा जगात युद्धासारखी परिस्थिती निर्माण होते, तेव्हा गुंतवणूकदार सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोन्याला प्राधान्य देतात. मध्य पूर्वेतील सध्याचा तणाव असूनही, सोन्याच्या किमतीत झालेल्या किंचित घसरणीने आर्थिक विश्लेषक आश्चर्यचकित झाले आहेत. मात्र किमतींमध्ये मोठी वाढ होण्यापूर्वी हा एक तात्पुरता दिलासा असू शकतो असं अनेकांना वाटतंय.

5 / 8

सध्या देशात लग्नसराईचा मौसम असून, सणांसारख्या शुभ प्रसंगी लोक मोठ्या प्रमाणात सोन्याची खरेदीही करतात. अशा परिस्थितीत, बाबा वांगा यांच्या भविष्यवाणीमुळे मध्यमवर्गीय मात्र चिंतेत आहेत. जर 10 ग्रॅम सोन्याचा भाव 2 लाख रुपयांपेक्षा जास्त झाला, तर सर्वसामान्यांसाठी सोनं खरेदी करणं तर दूर, ते पाहणंही एखाद्या स्वप्नाप्रमाणे ठरेल. यामुळे देशात सर्वाधिक सोन्याचा वापर करणाऱ्या दक्षिण भारतालाही मोठा धक्का बसू शकतो.

6 / 8

कमॉडिटी एक्सपर्टनुसार, सोन्याच्या किमती केवळ अफवांवर ठरत नाहीत. अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हचे निर्णय, रुपयाचे अवमूल्यन आणि महागाई हे घटक देखील सोन्याच्या भाववाढीस कारणीभूत ठरतात. युद्धामुळे बहुतांश वस्तूंच्या पुरवठ्यात व्यत्यय आला आहे, ज्यामुळे किमती वाढल्या आहेत. साहजिकच, दीर्घकाळ चाललेल्या युद्धाचा, सोन्यावरही परिणाम होऊ शकतो. मात्र जर त्यावर तोडगा निघाला, तर किमती कमी होण्याचीही शक्यता आहे.

7 / 8

बाबा वांगा यांच्या भविष्यवाणीच्या भीतीमुळे गुंतवणूक करण्यापूर्वी सध्याच्या बाजाराच्या परिस्थितीचे मूल्यांकन करणे महत्त्वाचे आहे, असे कमोडिटी विश्लेषकांचं म्हणणं आहे. सोनं ही नेहमीच एक सुरक्षित गुंतवणूक आहे, परंतु त्यात मोठी रक्कम गुंतवण्यापूर्वी आपल्या आर्थिक योजनेनुसार निर्णय घेणे उत्तम ठरतं. बाजारात मंदी असताना टप्प्याटप्प्याने सोने खरेदी करणं, हे खूप फायदेशीर ठरू शकतं.

8 / 8

बाबा वांगा यांची भविष्यवाणी यापूर्वीही खऱ्या ठरल्या आहेत. जगाच्या अनेक भागांमध्ये आर्थिक संकटाची चिन्हे आधीच दिसू लागली आहेत. म्हणूनच लोक यावेळीही त्यांचा इशारा गांभीर्याने घेत आहेत. बँकांवरील विश्वास जेवढा कमी होईल, तेवढ्या वेगाने बाजारात सोन्याची किंमत वाढेल. त्यामुळेच येत्या काळात सोन्याच्या दरात मोठी वाढ होण्याची शक्यता आहे. ( डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही.ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us