
अमेरिका, इराण, इस्त्रायल युद्धाचा आता जागतिक बाजारातील अनेक गोष्टींवर परिणाम होणार आहे. जळगावच्या सराफ बाजारावर देखील मोठा परिणाम झाला आहे. जळगावच्या सराफ बाजारात सोन्या आणि चांदीच्या दरात विक्रमी वाढ झाल्याचे समोर आले आहे.

अवघ्या दोन तासात सोन्या दरात तब्बल 1 हजार 500 रुपयांची पुन्हा मोठी वाढ झाली आहे. एकाच दिवसात सोन्याच्या दरात 8 रुपयांची तर चांदीच्या दरात तब्बल 20 हजारांची वाढ झाली आहे. या वाढलेल्या भावांमुळे सर्वसामान्यांचे सोने खरेदीचे स्वप्न स्वप्नच राहणार आहे.

आज 10 ग्रॅम सोन्याचे दर जीएसटीसह 1 लाख 72 हजार 10 रुपयांवर पोहोचले आहेत. आतापर्यंत सोन्याच्या भावातील ही सर्वात मोठी वाढ आहे. तर चांदीचे दर 2 लाख 98 हजार 700 रुपयांवर पोहोचले आहेत.

अमेरिका, इराण, इस्त्रायल युद्धाचा परिणाम आता अनेक गोष्टींवर होणार आहे. याचा थेट परिणाम सोन्याच्या दरांवर झाला आहे. अगदी कमी कालावधीत सोन्या आणि चांदीच्या दरात मोठी वाढ झाल्याचं सराफ व्यवसायिक यांचे म्हणणे आहे.

(टीप- वरच्या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. या लेखाच्या माध्यमातून गुंतवणूक करण्याचा सल्ला दिलेला नाही. कुठेही प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष गुंतवणूक करायची असेल किंवा कोणताही आर्थिक निर्णय घ्यायचा असेल तर त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्या)