
जळगावच्या सराफ बाजारात सोन्याच्या दरात पुन्हा वाढ झाली आहे. एक दिवसापूर्वी साडेतीन हजार रुपयांनी घसरलेल्या सोने दराने पुन्हा उसळी घेतली आहे.

लवकरच अमेरिकेतील आर्थिक आकडेवारी समोर येईल. अमेरिकेचा जीडीपी, बेरोजगारी आणि आयात-निर्यातीची आकडेवारी समोर येईल. त्यानंतर सोने आणि चांदीच्या किंमतीची दिशा ठरेल.

जळगावच्या सराफ बाजारात सोन्याचे दर १ हजाराने वाढून जीएसटी सह ९७ हजार ६४४ रुपयांवर पोहोचले आहे.

चांदीच्या दरातही किलोमागे १ हजार रुपयांची वाढ झाली असून चांदीचे दर जीएसटीसह १ लाख ९४० रुपयांवर पोहोचले आहे.

गेल्या तीन दिवसांपासून सोने आणि चांदीच्या किंमतीत सातत्याने बदल दिसून येत आहे. जळगाव सराफा बाजारात सोने आणि चांदीच्या भावात तफावत दिसून आली. चांदीचा तोरा उतरला तर सोन्याच्या किंमतीत असा बदल झाला.