Todays Gold Rate: सर्वसामान्यांना खरेदी करता येणार! सोन्याचा भाव कोसळला, आज 10 ग्रॅम सोन्यासाठी…

Todays Gold Rate: आज 18 मार्च रोजी सोन्याच्या दरात मोठी घसरण झाली आहे. आजचा 10 ग्रॅम सोन्याचा भाव किती आहे ते जाणून घ्या...

| Updated on: Mar 18, 2026 | 4:02 PM
1 / 5
इराणचे अमेरिका आणि इस्त्रायल विरोधात सुरु असलेल्या युद्धामुळे जगात खळबळ माजली आहे. या युद्धाचा जगभरातील अनेक गोष्टींवर परिणाम होत आहे. तेलाच्या किंमती वाढल्या आहेत, घरगुती गॅसचा तुटवडा निर्माण झाला आहे. तसेच सोने आणि चांदीच्या दरात देखील चढ-उतार पाहायला मिळत आहे.

2 / 5

आज जळगावच्या सराफ बाजारात सोन्या आणि चांदीच्या दरात मोठी घसरण झाल्याचे समोर आले आहे. गेल्या काही दिवसांपासून सोने आणि चांदीच्या दरात सतत वाढ होताना दिसत होती. पण आजचा दिवस सर्वसमान्यांसाठी आजचा दिवस चांगला आहे. आज सोन्याचे दर घसरले आहेत.

3 / 5

18 मार्च रोजी सोन्याच्या दरात 1 हजार रुपयांची घसरण झाली आहे. तर चांदीच्या दरात 4 हजार रुपयांची घसरण झाली आहे.

4 / 5

10 ग्रॅम सोन्यासाठी आज जीएसटीसह 1 लाख 60 हजार 165 रुपये मोजावे लागणार आहेत. तर चांदीचे दर जीएसटीसह 2 लाख 62 हजार 650 रुपयांवर पोहोचले आहेत. अमेरिका इराण युद्धाचा परिणाम झाला असून गेल्या 18 दिवसांपासून सोन्या-चांदीच्या दरात मोठी चढ-उतार सुरू आहे.

5 / 5

(टीप- वरच्या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. या लेखाच्या माध्यमातून गुंतवणूक करण्याचा सल्ला दिलेला नाही. कुठेही प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष गुंतवणूक करायची असेल किंवा कोणताही आर्थिक निर्णय घ्यायचा असेल तर त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्या)

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us