ऐन दिवाळीत सोने-चांदीच्या दरात उलटफेर; लक्ष्मीपूजनाच्या मुहूर्तावर खरेदीसाठी ग्राहकांची झुंबड, काय आहे आजचा भाव?
ऐन दिवाळीत सोने-चांदीच्या दरात उलटफेर पाहायला मिळत आहे. लक्ष्मीपूजनाच्या मुहूर्तावर खरेदीसाठी ग्राहकांची झुंबड पाहायला मिलत आहे. जाणून घ्या आजचा भाव

gold
Image Credit source: टीव्ही9 मराठी
- गेल्या आठवड्यापासून सोने-चांदीच्या चढ-उतार पाहायला मिळत आहे. दिवाळीत लक्ष्मीपूजनाच्या मुहूर्तावर ग्राहकांची सोने-चांदी दुकानात खरेदीसाठी झुंबड पाहायला मिळत आहे.
- दिवाळीत अनेकांनी गुंतवणूक म्हणून सोने-चांदीच्या दागिन्याच्या खरेदीकडे मोर्चा वळवला आहे. सोने-चांदीच्या दरात चढ-उतार होतानाही ग्राहक सोने-चांदीत गुंतवणूक करण्यास प्राधान्य देत आहेत.
- शुद्ध सोन्याची नगरी म्हणून प्रसिद्ध असलेल्या जळगावच्या सराफा बाजारात ग्राहकांचा खरेदीचा उत्साह पाहायला मिळत आहे. दिवाळीच्या धामधुमीदरम्यान जळगावातील सराफा बाजारातील सोने-चांदीचे दर देखील समोर आले आहेत.
- जळगावच्या सराफ बाजारात सोन्या चांदीचे दर स्थिर असल्याचे दिसून आले. सोन्या आणि चांदीच्या दरात कुठलीही वाढ अथवा घसरण नसल्याने नागरिकांना दिलासा मिळाला आहे. आज सोन्याचे दर जीएसटीसह 1 लाख 46 हजार 260 रुपये इतका आहे. तर चांदीचे दर जीएसटीसह 1 लाख 93 हजार 640 रुपये इतका आहे.
- आज दिवाळीतील सर्वात महत्त्वाचा लक्ष्मीपूजनचा मुहूर्त आहे. यामुळे पूजनासाठी लक्ष्मीचे सोन्याचे आणि चांदीचे शिक्के घेऊन जाण्याकडे नागरिकांचा कल आहे. तर लक्ष्मीपूजनाच्या मुहूर्तावर खरेदीसाठी नागरिकांची मोठी गर्दी दिसून येत आहे.
Loading...
{{{html}}}
Loading...
Unable to load recommendations.
Follow Us