Gold Rate : सोनं धडाम कोसळलं, एकाच दिवसात भाव थेट….आता 10 ग्रॅमसाठी किती रुपये लागणार?

युद्धामुळे सोने आणि चांदीच्या भावामुळे मोठा चढउतार पाहायला मिळत आहे. आज सलग दुसऱ्या दिवशी सोन्याचा भाव चांगलाच घसरला आहे. चांदीचा भावदेखील धाडकन पडला आहे.

| Updated on: Mar 05, 2026 | 6:14 PM
1 / 5
गेल्या काही दिवसांपासून सोने आणि चांदीच्या दरात मोठे चढउतार होताना पाहायला मिळत आहे. इराण-अमेरिका आणि इस्रायल यांच्यात युद्ध सुरू झाल्याने तर या दोन्ही मौल्यवान धातूंची किंमत कधी वाढलेली तर कधी कमी झालेली पाहायला मिळत आहे.

गेल्या काही दिवसांपासून सोने आणि चांदीच्या दरात मोठे चढउतार होताना पाहायला मिळत आहे. इराण-अमेरिका आणि इस्रायल यांच्यात युद्ध सुरू झाल्याने तर या दोन्ही मौल्यवान धातूंची किंमत कधी वाढलेली तर कधी कमी झालेली पाहायला मिळत आहे.

2 / 5

दरम्यान, आज (5 मार्च) सलग दुसऱ्या दिवशी सोने तसेच चांदीच्या भावात घसरण झाली आहे. सुवर्ण नगरी म्हणून ओळख असलेल्या जळगावमध्ये सोनं चांगलंच घसरलं आहे. आज दिवसभरात सोन्याचा भाव दीड हजारांनी घसरला आहे.

3 / 5

आज दिवसभरात सोन्याच्या दरात 1 हजार 500 रुपयांची तर चांदीच्या दरात 6 हजार रुपयांची घसरण झाली आहे. या नव्या घसरणीसह सोन्याचे दर जीएसटीसह 1 लाख 65 हजार 315 रुपयांवर पोहोचला आहे.

4 / 5

तर दुसरीकडे चांदीचा दर जीएसटीसह 2 लाख 72 हजार 915 रुपयांवर पोहोचला आहे. अमेरिका आणि इराणमध्ये सुरू असलेल्या युद्धामुळे सोन्या-चांदीच्या दरात चढउतार सुरू आहे. अशीच अस्थिरता काही दिवस कायम राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

5 / 5

(टीप- वरच्या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. या लेखाच्या माध्यमातून गुंतवणूक करण्याचा सल्ला दिलेला नाही. कुठेही प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष गुंतवणूक करायची असेल किंवा कोणताही आर्थिक निर्णय घ्यायचा असेल तर त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्या)

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us