Gondhal OTT: धुरंधरला मागे टाकत ऑस्करमध्ये गेलेला ‘गोंधळ’ कोणत्या OTT प्लॅटफॉर्मवर पाहता येणार?

Gondhal Movie Where to Watch: 'गोंधळ' हा सिनेमा सध्या चांगलाच चर्चेत आहे. पण तो कुठे पाहायला मिळणार? असा प्रश्न अनेकांना पडला आहे. चला जाणून घेऊया...

| Updated on: Sep 20, 2026 | 1:42 PM
1 / 5
महाराष्ट्राची पारंपारिक लोककला ग्रामिण संस्कृतीचे वास्तव दर्शन घडवणा 'गोंधळ' हा सिनेमा ऑस्करच्या शर्यतीमध्ये गेला आहे. या चित्रपटाला सिनेमागृहात हवं तेवढं यश मिळालं नाही. पण ऑस्करच्या यादीमध्ये जाताच सिनेमाने सर्वांचे लक्ष वेधले आहे. हा सिनेमा अनेकांनी पाहिला नाही. आता तो कुठे पाहता येईल? असा प्रश्न अनेकांना पडला आहे.

2 / 5

सिनेमा प्रदर्शित झाला की तो लगेच ओटीटी प्लॅटफॉर्मवर येतो. त्यामुळे 'गोंधळ' हा सिनेमा कुठे पाहता येणार? असा प्रश्न अनेकांना पडला आहे. चला जाणून घेऊया त्याविषयी

3 / 5

इकॉनॉमिक टाइम्सच्या वृत्तानुसार, दिग्दर्शकांच्या माहितीनुसार हा सिनेमा हिंदी, मल्याळम आणि कन्नड भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. ओटीटी प्लॅटफॉर्मवर पाहण्याऐवजी प्रेक्षकांनी हा चित्रपट सिनेमागृहात जाऊन पाहावा, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

4 / 5

'गोंधळ' हा सिनेमा ओटीटीवर प्रदर्शनाची घोषणा अद्याप झालेली नसली तरी दिग्दर्शक संतोष डावखर यांनी ‘गोंधळ’ हा चित्रपट इतर भाषांमध्ये उपलब्ध करून देण्यात येईल, असे स्पष्ट केले आहे.

5 / 5

दिग्दर्शकांनी सांगितले की, चित्रपटातील सुरुवातीचा सीन हा सुमारे २६ मिनिटांचा असून तो वन टेकमध्ये चित्रित करण्यात आला आहे. दरम्यान, हा चित्रपट ऑनलाइन रिलीज होईल का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तसेच हा सिनेमा सिनेमागृहात नेमका कधी प्रदर्शित होणार, हा प्रश्नही प्रेक्षकवर्गाकडून वारंवार उपस्थित केला जात आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us