सरकारी रुग्णालयांमध्ये जन्मणाऱ्या बालकांना मिळणार १ ग्रॅम सोन्याची अंगठी, योजना आहे तरी काय?
महाराष्ट्रातील लाडकी बहिण योजना ही देशभरात चांगलीच गाजली आहे. त्यानंतर आता आणखी एक योजना सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.

प्रत्येक राज्यामध्ये नागरिकांसाठी वेगवेगळ्या प्रकारच्या योजना राबवल्या जातात. महाराष्ट्रातील लाडकी बहिण योजना ही देशभरात चांगलीच गाजली आहे. त्यानंतर आता आणखी एक योजना सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. या योजनेअंतर्गत सरकारी सरकारी रुग्णालयांमध्ये जन्मणाऱ्या बालकांना १ ग्रॅम सोन्याची अंगठी देण्यात येणार आहे.
आम्ही ज्या योजनेबाबत बोलत आहोत त्या योजनेचे नाव 'थाईमामण थंगा मोथिरा थिट्टम' आहे. ही तमिळनाडू सरकारची योजना आहे.
मुख्यमंत्री सी. जोसेफ विजय यांच्या हस्ते २८ सप्टेंबर २०२६ रोजी या योजनेचा शुभारंभ केला जाणार आहे. या योजनेअंतर्गत सरकारी रुग्णालयांत जन्म घेणाऱ्या प्रत्येक बाळाला १ ग्रॅम सोन्याची अंगठी दिली जाणार आहे.
पहिल्या टप्प्यासाठी सरकारने १.२८ लाख सोन्याच्या अंगठ्या खरेदी केल्या असून प्रत्येक अंगठीवर सिरीअल नंबर असणार आहे. तमिळनाडू सरकारची 'थाईमामण थंगा मोथिरा थिट्टम' योजना २८ सप्टेंबरपासून लागू होणार आहे.
२२ जून, मुख्यमंत्री विजय यांचा वाढदिवस ते २८ सप्टेंबर दरम्यान सरकारी रुग्णालयांत जन्मलेल्या बालकांनाही या योजनेचा लाभ मिळणार आहे.