Govinda: ज्यांना जळायचय त्यांना जळू दे पण यापुढे आम्ही..गोविंदासोबतच्या नात्यावर कोमलचं मोठं वक्तव्य

Govinda: गेल्या काही दिवसांपासून बॉलिवूड अभिनेता गोविंदा हा चांगलाच चर्चेत आहे. तो अभिनेत्री कोमल रानीला स्वर्णकारला डेट करत असल्याचे बोलले जात आहे. आता यावर कोमलने प्रतिक्रिया दिली आहे.

| Updated on: Oct 03, 2026 | 8:17 AM
1 / 6
कश्मीरा शाह आणि दिव्या खोसला यांसारख्या स्टार्सनी यापूर्वी गोविंदासोबत दिसलेली अभिनेत्री कोमल रानीवर टीका केली होती. कोमल रानी स्वर्णकार अभिनेता गोविंदाला डेट करत असल्याचे बोलले जात आहे. सुनीता आहूजा यांनी यापूर्वीच पती गोविंदाला शुगर डॅडी म्हणून त्यांच्या कथित नात्यावर टीका केली होती. आता कोमल रानीने टीकेचे उत्तर दिले आहे. तिने स्पष्ट शब्दात दिव्या खोसलाला सुनावले आहे.

2 / 6

कोमल रानी स्वर्णकारने तिच्या सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये तिने गोविंदासोबतच्या आपल्या अफेअरवरबाबत प्रतिक्रिया दिली आहे. कोमल रानीने त्या सेलिब्रिटींचा उल्लेख केला, ज्या तिला अफेअरवरुन सुनावत आहेत.

3 / 6

कोमलने, ‘अलीकडे मी काही सेलिब्रिटींना गोविंदा जी आणि माझ्या वैयक्तिक आयुष्यावर तसेच आमच्या चारित्र्यावर वक्तव्य करताना पाहिले आहे. मी त्यांना यापूर्वी कोणत्याही गंभीर मुद्द्यावर आपले मत मांडण्यासाठी इतक्या ठामपणे पुढे येताना पाहिले नाही. मग ते दहशतवाद असो, राजकारण असो, अभिनेत्यांचा मृत्यू असो किंवा दुसऱ्या अभिनेत्याच्या अनेक लग्नांची बाब असो. मग आमचे वैयक्तिक आयुष्य अचानक सार्वजनिक तमाशा का बनले आहे?’ या आशयाची पोस्ट केली आहे.

4 / 6

कोमल रानीने लालबागला एकत्र का गेले होते? याबाबतही प्रतिक्रिया दिली. तो केवळ आगामी चित्रपटाशी संबंधित एक भाग होता असे ती म्हणाली.

5 / 6

‘सिनेमातील हिरोसोबत गणपती बाप्पाच्या समोर जाणे आणि आपल्या आगामी चित्रपट ‘रूपा’च्या यशासाठी प्रार्थना करणे केव्हापासून लाजेची बाब झाली? हा राष्ट्रीय मुद्दा किंवा इतरांसाठी ‘दिखावा’ कसे बनले? आम्ही आमचा चित्रपट ‘रूपा’ची घोषणा केली होती, कुठल्याही रोमँटिक अफेअरची नाही’ असे रुपा पुढे म्हणाली.

6 / 6

कोमलने अनेकांना उत्तर देताना म्हटले की, ‘आम्ही एकत्र काम करत आहोत आणि आम्ही पुढेही एकत्र दिसत राहू. यामुळे कुणाला त्रास होत असेल, तर त्यांना जळू द्या.’नावाशी जोडणे थांबवावे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us