गोविंदा Gfसोबत एअरपोर्टवर दिसताच सुनीताने दिली प्रतिक्रिया, म्हणाली…
गोविंदा नुकताच विमानतळावर कोमल नावाच्या अभिनेत्रीसोबत दिसला. ही तिच अभिनेत्री आहे जिच्यासोबत गोविंदाचे अफेअर सुरु असल्याचे म्हटले जात आहे. आता यावर गोविंदाची बायको सुनीता अहूजाने प्रतिक्रिया दिली आहे.

बॉलिवूड अभिनेता गोविंदा वैयक्तिक आयुष्यामुळे गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. गोविंदाचे एका मराठमोळ्या अभिनेत्रीसोबत अफेअर असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. त्यानंतर गोविंदा विमानतळावर एका अभिनेत्रीसोबत दिसला. ही तिच अभिनेत्री असल्याचे म्हटले जात आहे. आता यावर गोविंदाची बायको सुनीता अहूजाने प्रतिक्रिया दिली आहे.

कोमल तीच अभिनेत्री आहे, जिच्याबद्दल सुनीता पती गोविंदावर एक्स्ट्रा मॅरिटल अफेअरचा आरोप करत आहे. जेव्हा पॅपराजींनी सुनीताला याबद्दल प्रश्न विचारला, तेव्हा तिने उत्तर दिले की गोविंदाची बुद्धी भ्रष्ट झाली आहे.

सुनीता आहूजाला जेव्हा पॅपराजींनी विचारले की गोविंदा विमानतळावर एका अभिनेत्रीसोबत दिसला. ते ऐकून सुनीता भडकली आणि म्हणाली, ‘तुम्ही लोक ते म्हणणे ऐकले असेल ना – विनाशकाळे विपरीत बुद्धी. त्याची बुद्धी पूर्णपणे भ्रष्ट झाली आहे, म्हणूनच तो अशा गोष्टी करत आहे. आता यावर मी आणखी काय बोलावे?’

चाहते गोविंदाला चीटर नंबर वन म्हणत आहेत हे सुनीताला सांगताच ती म्हणाली, ‘हा प्रश्न मला गोविंदाच्या फॅन्सना विचारायला हवा. जेव्हा मी काही बोलते, तेव्हा सगळे मलाच ट्रोल करायला लागतात. आता माझी इच्छा आहे की मीडिया आणि गोविंदाचे फॅन्स यांनी स्वतः या प्रश्नाचे उत्तर द्यावे. मला काही विचारू नका, भाXX जाऊ दे. मला आता या सगळ्या गोष्टींत काही रस नाही.’

सुनीताने एका मुलाखतीमध्ये कोमल नावाच्या मुली आवडत नसल्याचा उल्लेख केला होता. त्यानंतर गोविंदा विमानतळावर अभिनेत्री कोमलसोबत दिसला. त्यामुळे गोविंदाचे या अभिनेत्रीसोबत अफेअर सुरु असल्याच्या चर्चांना उधाण आले.

अलीकडेच एएनआयला दिलेल्या मुलाखतीत गोविंदाने कबूल केले की आयुष्याच्या ३४ वर्षांपर्यंत तो खूपच सरळ-साधा होता आणि आज जेव्हा तो आपले जुने दिवस आठवतो, तेव्हा त्याला स्वतःलाही लाज वाटते.