Leafy Vegetables : घरच्या कुंडीत सहज उगतात या पालेभाज्या; हिवाळ्यात हमखास लावा अन् ताजी भाजी खा!

घरच्या घरी ताज्या आणि हिरव्या पालेभाज्या पिकवण्याची आवड असेल, तर नोव्हेंबर महिना यासाठी उत्तम आहे. या दिवसांत थंड वातावरणामुळे अनेक पालेभाज्यांची लागवड करता येते. विशेष म्हणजे, यासाठी मोठ्या बागेची गरज नसून बाल्कनीतील कुंड्या किंवा ग्रो बॅगमध्येही भाज्या सहज उगवता येतात. जाणून घेऊया अशाच 5 पालेभाज्यांविषयी.

| Updated on: Nov 28, 2026 | 8:21 PM
1 / 5
मोहरीची भाजी : हिवाळ्यात मोहरीची पाने उगवण्यासाठी नोव्हेंबर महिना चांगला आहे. कुंडी किंवा ग्रो बॅगमध्ये तिच्या बिया पेरा. रोपांच्या वाढीसाठी पुरेशी जागा ठेवा.

मोहरीची भाजी : हिवाळ्यात मोहरीची पाने उगवण्यासाठी नोव्हेंबर महिना चांगला आहे. कुंडी किंवा ग्रो बॅगमध्ये तिच्या बिया पेरा. रोपांच्या वाढीसाठी पुरेशी जागा ठेवा.

2 / 5

पालक : पालकाची लागवड कुंडीत सहज करता येते. यासाठी पाण्याचा योग्य निचरा होणारी माती वापरा. रोपांना नियमित पाणी द्या.

3 / 5

मेथी : मेथीच्या बिया कुंडीत पसरवून त्यावर मातीचा हलका थर द्या. काही दिवसांत रोपे उगवू लागतात. कोवळी पाने भाजीसाठी वापरता येतात.

4 / 5

कोथिंबीर : कोथिंबिरीच्या बिया थोड्या फोडून मातीत पेरा. कुंडीला पुरेसा सूर्यप्रकाश मिळेल अशा ठिकाणी ठेवा. काही दिवसांत हिरवीगार पाने येऊ लागतील.

5 / 5

चकवत आणि पुदिना : हिवाळ्यात चाकवत कुंडीत बियांपासून उगवता येतो. पुदिना मात्र कटिंगपासूनही सहज वाढवता येतो. दोन्ही रोपांना योग्य पाणी आणि प्रकाश द्या. बाल्कनीत पालेभाज्या वाढवताना पुरेसा सूर्यप्रकाश, मातीतील ओलावा आणि पाण्याचा निचरा याकडे लक्ष द्या. योग्य काळजी घेतल्यास घरच्या घरी ताज्या भाज्या मिळू शकतात.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us