
मराठी चित्रपटसृष्टीतील अप्सरा अर्थात अभिनेत्री सोनाली कुलकर्णीनं हा सुंदर फोटो शेअर केला आहे. निळ्या रंगाच्या साडीमध्ये ती कमालीची सुंदर दिसतेय.

अभिनेता सिद्धार्थ चांदेकर आणि अभिनेत्री मिताली मयेकरचा हा लग्नानंतर पहिलाच गुढीपाडवा आहे. त्यामुळे दोघांसाठीही हा सण खास ठरतोय. मिताली आणि सिद्धार्थनं हा फोटो शेअऱ करत गुढीपाडव्याच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

तुला पाहते रे मालिकेतून चाहत्यांच्या मनावर राज्य केलेली अभिनेत्री गायत्री दातारनं हा सुंदर फोटो शेअर करत शुभेच्छा दिल्या आहेत.

अभिनय, कविता, सौंदर्य याची खाण अभिनेत्री स्पृहा जोशीनं सुद्धा सुंदर अंदाजात शुभेच्छा दिल्या आहेत.

सौंदर्याची खाण अर्थात अमृता खानविलकरनं हा सुंदर फोटो शेअर केला आहे.

शुभमंगल ऑनलाईन मालिकेतून घराघरात पोहोचलेले शंतनू आणि शर्वरी अर्थात अभिनेता सुयश टिळक आणि अभिनेत्री सायली संजीवनं खास अंदाजात गुढीपाडव्याच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

फँड्री फेम अभिनेत्री राजेश्वरी खरातनं हा मराठमोळी साज करत चाहत्यांसाठी खास फोटो शेअर केला आहे.

अभिनेत्री मृण्मयी देशपांडेनं देखील हा सुंदर फोटो शेअर केला आहे.

अभिनेत्री काजोलचा हा मराठमोळा फोटो सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालतोय. तिनं हे फोटो शेअर करत चाहत्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

तर लाडकी अभिनेत्री प्राजक्ता माळीनं सुद्धा सुंदर फोटो शेअर केला आहे.