
सोशल मीडियावर एमएमएस लीक झाल्याच्या अनेक घटना समोर येतात. 19 वर्षीय सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर गुनगुन गुप्ताचा MMS व्हिडीओ लीक झाल्याची घटना नुकतीच घडली आहे. यावरून तिला प्रचंड ट्रोल केलं जातंय. मात्र एखाद्या सेलिब्रिटी किंवा इन्फ्लुएन्सरचा MMS लीक झाल्याची ही काही पहिलीची घटना नाही. याआधीही बऱ्याच अभिनेत्रींचे एमएमएस लीक झाले आहेत.

भोजपुरी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री अक्षरा सिंहचाही MMS लीक झाला होता. अक्षराचा व्हिडीओ टेलीग्राम, रेडिट आणि इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरही व्हायरल झाला होता. या व्हायरल एमएमएसमध्ये अक्षरा तिच्या बॉयफ्रेंडसोबत इंटिमेट होत असल्याचा दावा नेटकऱ्यांनी केला.

'कच्चा बादाम' फेम अंजली अरोरासुद्धा तिच्या प्रायव्हेट व्हिडीओमुळे चर्चेत आली होती. लीक झालेल्या व्हिडीओमध्ये दिसणारी मुलगी अंजली अरोराच असल्याचा दावा नेटकऱ्यांनी केला होता. तर अंजलीने याविरोधात प्रतिक्रिया दिली होती. मला बदनाम करण्याचा कट रचला जातोय, असं ती म्हणाली होती.

'जस्सी जैसी कोई नहीं' या मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री मोना सिंहसोबतही अशीच घटना घडली होती. काही वर्षांपूर्वी मोनाचा काही सेकंदांचा एमएमएस व्हिडीओ व्हायरल झाला होता. यानंतर मोनाने असं स्पष्ट केलं होतं की व्हिडीओत दिसणारी मुलगी मी नाही तर दुसरीच कोणीतरी आहे.

एमएमएस लीक कांडमध्ये अभिनेत्री हंसिका मोटवानीचंही नाव चर्चेत आहे. बाथटबमध्ये अंघोळ करणाऱ्या एका मुलीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. या व्हिडीओत दिसणारी मुलगी हंसिकाच असल्याचं म्हटलं गेलं होतं. मात्र तो व्हिडीओ फेक असल्याचा दावा हंसिकाने केला होता.

राधिका आपटे जेव्हा फिल्म इंडस्ट्रीत नवीन होती, तेव्हा तिचे काही प्रायव्हेड व्हिडीओ आणि फोटो व्हायरल झाले होते. त्याचा माझ्यावर खूप वाईट परिणाम झाल्याची प्रतिक्रिया राधिकाने एका मुलाखतीत दिली होती. "मी 4 दिवस घराबाहेर पडू शकले नव्हते. फक्त मीडिया माझ्याबद्दल काय म्हणतेय, या कारणामुळेच नाही. तर ड्रायव्हर, वॉचमन आणि स्टायलिस्टच्या ड्रायव्हरने देखील त्या व्हिडीओ क्लिप आणि व्हायरल झालेल्या फोटोंवरून मला ओळखण्यास सुरुवात केली होती," असं राधिका म्हणाली होती.