
हंसिका तिच्या प्रोफेशनल आयुष्यापेक्षा तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे नेहमीच चर्चेत असते. ती अनेक वेळा वादातही सापडली आहे. सध्या अभिनेत्रीच्या लग्नाच्या ब्रेकअपच्या चर्चा सुरू आहेत.

हंसिकाने 2022 मध्ये सोहेल खतुरियाशी लग्न केलं पण गेल्या 2 वर्षांपासून ती तिच्या पतीसोबत नाही तर तिच्या आईसोबत राहत आहे. त्यामुळे सोशल मीडियावर त्यांच्या घटस्फोटाची चर्चा जोरात सुरू आहे.

आता अभिनेत्रीच्या पतीने या अफवेवर मौन सोडलं आहे. अभिनेत्री म्हणाली, रंगणाऱ्या चर्चा पुर्णपणे खोट्या आहेत, परंतु हंसिकाने अद्याप या प्रकरणाबद्दल काहीही सांगितलेले नाही.

रिपोर्टनुसार, लग्नानंतर हंसिका तिचा पती सोहेल आणि त्याच्या पालकांसोबत राहत होती, पण नंतर ती एका इमारतीत शिफ्ट झाली, आता अभिनेत्री तिच्या आईसोबत राहू लागली.

हंसिका आणि सोहेलच्या लग्नानंतर अनेक चर्चा सुरू झाल्या. सोहेलचं पहिलं लग्न हंसिकाच्या मैत्रिणीशी झालं होतं पण नंतर दोघांचा घटस्फोट झाल्यानंतर त्याने हंसिकाशी लग्न केलं.