लहानपणी हातात बॅट घेऊन फिरत होता हा ‘हँडसम हंक’, एका चित्रपटाने रातोरात बनवले सुपरस्टार! ओळखले का?
Birthday Special: आपल्या दमदार व्यक्तिमत्त्वाने, हँडसम लूकने आणि उत्कृष्ट अभिनयाने चाहत्यांच्या मनावर राज्य करणारा अभिनेता आज आपला 41 वा वाढदिवस साजरा करत आहे. त्याच्या आयुष्यातील काही खास आणि रंजक गोष्टी जाणून घेऊया.

क्रिकेटर होण्याचं होतं स्वप्न! : आदित्य रॉय कपूरला लहानपणापासूनच क्रिकेटची प्रचंड आवड होती. त्याला व्यावसायिक क्रिकेटपटू व्हायचं होतं आणि त्यासाठी त्याने क्रिकेटचं प्रशिक्षणही घेतलं होतं. मात्र, सहावीनंतर त्याने क्रिकेटचं प्रशिक्षण सोडलं.
व्हिडिओ जॉकी म्हणून केली करिअरची सुरुवात: अभिनेता होण्यापूर्वी आदित्यने व्हिडिओ जॉकी म्हणून काम केलं होतं. 'पकाऊ' आणि 'इंडियाज हॉटेस्ट' यांसारख्या कार्यक्रमांमधून त्याने तरुण प्रेक्षकांमध्ये स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली.
. सपोर्टिंग रोलमधून बॉलिवूडमध्ये पदार्पण: आदित्यने 2009 मध्ये 'लंडन ड्रिम्स' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. त्यानंतर 2010 मध्ये 'अॅक्शन रिप्ले' या चित्रपटातही तो सहाय्यक भूमिकेत दिसला. सुरुवातीला छोट्या भूमिका साकारत त्याने अभिनयाच्या प्रवासाला सुरुवात केली.
फिल्मी पार्श्वभूमी असलेलं कुटुंब:आदित्यचे आजोबा रघुपत रॉय कपूर हे 1940 च्या दशकातील चित्रपट निर्माते होते. त्याची आई सलोमी रॉय कपूर या माजी मिस इंडिया आणि कोरिओग्राफर आहेत. त्यामुळे त्याच्या कुटुंबाचा मनोरंजन क्षेत्राशी जुना संबंध आहे.
दोन्ही भाऊही मनोरंजन क्षेत्रात सक्रिय: आदित्यचा मोठा भाऊ सिद्धार्थ रॉय कपूर हा प्रसिद्ध चित्रपट निर्माता असून त्याने अभिनेत्री विद्या बालनशी लग्न केलं आहे. तर दुसरा भाऊ कुणाल रॉय कपूर हा अभिनेता आहे. अशा प्रकारे संपूर्ण कुटुंबाचा चित्रपटसृष्टीशी जवळचा संबंध आहे.
'आशिकी 2'ने बदललं नशीब!: 2013 मध्ये प्रदर्शित झालेल्या मोहित सुरी दिग्दर्शित 'आशिकी 2' या चित्रपटाने आदित्यला खरी ओळख मिळवून दिली. श्रद्धा कपूरसोबत त्याने राहुल जयकर ही भूमिका साकारली. या चित्रपटाच्या प्रचंड यशामुळे आदित्य रातोरात लोकप्रिय झाला आणि त्याच्या करिअरला मोठी कलाटणी मिळाली.