म्यानमारमधील युद्धाच्या भीतीने भारतात पळून आली होती बॉलिवूड अभिनेत्री; सलमान खानशी आहे खास नातं!

| Updated on: Nov 21, 2026 | 10:25 AM
1 / 6
म्यानमारमध्ये झाला जन्म: बॉलिवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्री आणि डान्सर हेलन यांचा जन्म 21 नोव्हेंबर 1938 रोजी म्यानमारमधील यांगून येथे झाला होता.

म्यानमारमध्ये झाला जन्म: बॉलिवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्री आणि डान्सर हेलन यांचा जन्म 21 नोव्हेंबर 1938 रोजी म्यानमारमधील यांगून येथे झाला होता.

2 / 6

दुसऱ्या महायुद्धामुळे सोडला देश: 1943 च्या सुमारास जपानी सैन्याने म्यानमारवर हल्ले केले. या युद्धाच्या भीतीमुळे हेलन यांचे कुटुंब भारतात स्थलांतरित झाले.

3 / 6

आसाममार्गे मुंबईत आगमन: भारतात आल्यानंतर हेलन आणि त्यांचे कुटुंब काही काळ आसाममध्ये राहिले. त्यानंतर ते मुंबईत स्थायिक झाले.

4 / 6

दोन वेळा केले लग्न: हेलन यांनी 1957 मध्ये प्रेम नारायण अरोरा यांच्याशी लग्न केले होते. मात्र, 1974 मध्ये त्यांचा घटस्फोट झाला. त्यानंतर 1981 मध्ये त्यांनी सलीम खान यांच्याशी विवाह केला

5 / 6

सलमान खान यांच्याशी खास नातं: हेलन या सलमान खान यांच्या सावत्र आई आहेत. मात्र, सलमान त्यांच्यावर सख्ख्या आईप्रमाणे प्रेम करतात आणि त्यांचा आदर करतात.

6 / 6

300 हून अधिक चित्रपटांमध्ये डान्स: हेलन यांनी जवळपास 300 चित्रपटांमध्ये डान्स नंबर केले आहेत. 'ये मेरा दिल', 'मेरा नाम चिन चिन चू', 'महबूबा महबूबा' आणि 'मोनिका ओ माय डार्लिंग' ही त्यांची गाजलेली गाणी आहेत.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us