AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Kurla Phoenix Mall : कुर्ला फिनिक्स मॉलजवळील उद्यानात तरुण-तरुणीला मारहाण, 8 अल्पवयीन ताब्यात

Kurla Phoenix Mall : गार्डनमध्ये फोटो काढणाऱ्या जोडप्यावर मुलांच्या ग्रुपने अश्लील शेरेबाजी केली. जेव्हा या शेरेबाजीला जोडप्याने विरोध केला, तेव्हा त्यांना मारहाण करण्यात आली.

Kurla Phoenix Mall : कुर्ला फिनिक्स मॉलजवळील उद्यानात तरुण-तरुणीला मारहाण, 8 अल्पवयीन ताब्यात
Camera
| Updated on: Nov 21, 2026 | 10:15 AM
Share

कुर्ला येथील फिनिक्स मॉलजवळ महानगरपालिकेच्या एका उद्यानात फोटो काढत असलेल्या तरुण-तरुणीशी छेडछाड आणि मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. काल घडलेल्या या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. माहितीनुसार, उद्यानात फोटो काढत असलेल्या जोडप्यावर 8 ते 10 अल्पवयीन मुलांच्या गटाने शेरेबाजी सुरू केली. विरोध केल्यावर आरोपींनी दोघांनाही बेदम मारहाण केली, ज्याचा व्हिडिओ स्थानिकांनी मोबाईलमध्ये रेकॉर्ड केला.

गार्डनमध्ये फोटो काढणाऱ्या जोडप्यावर मुलांच्या ग्रुपने अश्लील शेरेबाजी केली. जेव्हा या शेरेबाजीला जोडप्याने विरोध केला, तेव्हा त्यांना मारहाण करण्यात आली. त्यावेळी तिथे उपस्थित असलेल्या लोकांनी या घटनेचा व्हिडिओ बनवला. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. एक अल्पवयीन आरोपी चप्पल सारख्या वस्तूने युवकाला मारहाण करताना दिसतो. दुसरा मुलगा युवतीच्या डोक्यावर काठी मारताना दिसतोय.

जुवेनाइल जस्टिस बोर्डासमोर हजर केलं जाणार

पीडितांच्या तक्रारीवरून घाटकोपर पोलिसांनी तातडीने कारवाई करत 8 अल्पवयीनांना ताब्यात घेतले आहे. पोलीस उपायुक्त (DCP) गणेश शिंदे यांनी सांगितले की, 8 अल्पवयीनांविरोधात भारतीय न्याय संहिता (BNS) कलम 189(2), 189(4), 118(1), 352 आणि 351(2) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सर्वांना Juvenile Justice Board समोर हजर करून कठोर कायदेशीर कारवाई केली जाणार आहे. सर्व आरोपींना जुवेनाइल जस्टिस बोर्डासमोर हजर केलं जाईल. पोलिसांनी आठही आरोपींविरोधात गुन्हा नोंदवला आहे. आरोपींविरोधात कायदेशीर कारवाई होईल.

Follow Us
पुण्यात ठाकरे सेनेच्या नेत्या रेखा कोंडे यांच्यावर हल्ला; जरांगे...
Pune : पुण्यात ठाकरे सेनेच्या नेत्या रेखा कोंडे यांच्यावर हल्ला; मनोज जरांगेंवर गंभीर आरोप!
गोकुळनंतर आता वारणा दूध संघाचाही मोठा निर्णय! दुधाचे दर वाढले...
गोकुळनंतर आता वारणा दूध संघाचाही मोठा निर्णय! दुधाचे दर वाढले, ग्राहकांना महागाईचा फटका
डिलिमिटेशनला विरोध नाही, पण दक्षिणेकडील राज्यांवर अन्याय नको...
डिलिमिटेशनला विरोध नाही, पण दक्षिणेकडील राज्यांवर अन्याय नको; पृथ्वीराज चव्हाणा यांसह इंडिया आघाडीची भूमिका स्पष्ट
मोठी बातमी! फडणवीस सरकारकडून शेतकरी कर्जमाफीची पहिली यादी जाहीर, तुमचं
मोठी बातमी! फडणवीस सरकारकडून शेतकरी कर्जमाफीची पहिली यादी जाहीर, 1.69 लाख शेतकऱ्यांना दिलासा
पुण्यात थंडीचा कडाका! पारा 11.3 अंशांवर, महाबळेश्वरलाही टाकलं मागे;
पुण्यात थंडीचा कडाका! पारा 11.3 अंशांवर, महाबळेश्वरलाही टाकलं मागे; राज्यभरातील हवामानाचा अंदाज...
अमरावतीत खळबळ! ठाकरे गटाच्या नगरसेवकाकडून सहाय्यक आयुक्तांना मारहाण...
अमरावतीत खळबळ! ठाकरे गटाच्या नगरसेवकाकडून सहाय्यक आयुक्तांना मारहाण, CCTV फुटेज समोर
महाराष्ट्रासाठी प्राणांची आहुती देणाऱ्या 106 हुतात्म्यांना अभिवादन...
महाराष्ट्रासाठी प्राणाची आहुती देणाऱ्या 106 हुतात्म्यांना अभिवादन; हुतात्मा चौकात CM देवेंद्र फडणवीसांकडून अभिवादन
जिममधील प्रोटीन पावडरबाबत तुकाराम मुंढेंचा मोठा निर्णय, आता लायसन्स अन
Tukaram Mundhe : जिममधील प्रोटीन पावडरबाबत तुकाराम मुंढेंचा मोठा निर्णय, आता लायसन्स अनिवार्य...
DCM एकनाथ शिंदेंच्या हस्ते विठ्ठल-रखुमाईची शासकीय महापूजा
पंढरीत विठ्ठल नामाचा गजर! DCM एकनाथ शिंदेंच्या हस्ते विठ्ठल-रखुमाईची शासकीय महापूजा
अभिजीत पाटलांना थेट मंत्रिपदाची ऑफर, भरत गोगावलेंचं विधान चर्चेत
Bharat Gogawale : अभिजीत पाटलांना थेट मंत्रिपदाची ऑफर, भरत गोगावलेंचं विधान चर्चेत