AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ठाकरे बंधूंना भाजप नेत्याचं निमंत्रण, जवळीक वाढली? राजकीय संकेत काय?

मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटम यांनी राज आणि उद्धव ठाकरेंना मुंबई बुक फेस्टिवल व 'मधुरव' नाटकासाठी निमंत्रण दिले आहे. यामुळे भाजप-ठाकरे बंधूंमधील वाढत्या जवळीकीचे राजकीय संकेत काय, याची चर्चा सुरू आहे. नुकतेच ठाकरे बंधू आणि फडणवीस एकाच मंचावर होते. या निमंत्रणाने पुन्हा एकदा राजकीय चर्चा रंगली आहे.

ठाकरे बंधूंना भाजप नेत्याचं निमंत्रण, जवळीक वाढली? राजकीय संकेत काय?
uddhav thackeray Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Nov 21, 2026 | 10:02 AM
Share

मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना भाजपचे मुंबई अध्यक्ष अमित साटम यांनी बुक फेस्टिव्हलचं निमंत्रण दिलं आहे. अमित साटम यांनी ट्विट करून हे निमंत्रण दिलं आहे. त्यामुळे भाजप आणि ठाकरे बंधूंची जवळीक वाढतेय का? अशी चर्चा रंगली आहे. काही दिवसांपूर्वी भाजप नेते आणि ठाकरे बंधूं एका मंचावर आले होते. तसेच दोन्हीकडून एकमेकांवर टीका करणं टाळलं जात आहे, त्यातच आता अमित साटम यांनी हे निमंत्रण दिल्याने राजकीय वर्तुळात राजकीय चर्चांना उधाण आलं असून यामागे काही राजकीय संकेत आहेत का? अशी चर्चाही रंगली आहे.

मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटम यांनी एक्सवर राज आणि उद्धव ठाकरेंना उद्देशून ट्विट केलं आहे. मुंबई बुक फेस्टिव्हलमधील कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी अमित साटम यांनी ठाकरे बंधूंना निमंत्रण दिलं आहे. मराठी भाषेवरील “मधुरव – बोरू ते ब्लॉग” या नाटकाच्या प्रयोगालाही उपस्थित राहण्याचे साटम यांच्याकडून निमंत्रण देण्यात आलं आहे. ठाकरे बंधू भाजपच्या मुंबई अध्यक्षांच्या निमंत्रणाचा स्वीकार करणार का? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

कलिना कॅम्पसमध्ये फेस्टिव्हल

मुंबई विद्यापीठापाच्या कलिना कॅम्पसमध्ये 24 ते 29 नोव्हेंबर दरम्यान मुंबई बुक फेस्टिव्हलचे आयोजन करण्यात आलं आहे. या बुक फेस्टिव्हलमध्ये 600 हून अधिक प्रकाश सहभागी होणार आहे. हा महोत्सव मुंबईच्या साहित्यिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक विश्वासाठी एक महत्त्वपूर्ण उपक्रम ठरणार आहे.

मुंबईला एक भव्य शैक्षणिक आणि सांस्कृतिक महोत्सव देण्याच्या उद्देशाने या बुक फेस्टिव्हलचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवात दररोज सायंकाळी विविध सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी असणार आहे. या कार्यक्रमांचा विशेष भाग म्हणून शनिवार, 28 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 6 वाजता मधुरव बोरू ते ब्लॉग’ हे मराठी भाषेच्या 2 हजार वर्षांच्या इतिहासाचा आणि प्रवासाचा वेध घेणारे नाटक सादर होणार आहे. मराठी भाषा ही केवळ संवादाचे माध्यम नसून ती आपल्या अस्मितेचा, संस्कृतीचा आणि हजारो वर्षांच्या वैभवशाली परंपरेचा वारसा आहे. या भाषेचा दोन हजार वर्षांचा प्रवास नव्या पिढीसमोर मांडण्याचा आमचा हा छोटासा प्रयत्न आहे, असं अमित साटम यांनी म्हटलं आहे.

मराठी भाषेचा अभिमान आणि तिच्या सांस्कृतिक वारशाविषयीची आपली आस्था लक्षात घेता, मराठी भाषेच्या उगमापासून आजपर्यंतचा इतिहास जाणून घेण्याकरिता आपण या नाटकाला आवर्जून उपस्थित राहावे तसेच मुंबई बुक फेस्टिव्हलकरिता उपस्थित राहावे, अशी विनंती साटम यांनी राज आणि उद्धव ठाकरे यांना केली आहे.

आणखी कोण येणार?

दरम्यान, या फेस्टिव्हलला आणखी कोण येणार? हे अद्याप गुलदस्त्यात आहे. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार येणार का? याची उत्सुकताही सर्वांना लागली आहे.

फडणवीस- ठाकरे एकाच मंचावर

काही दिवसांपूर्वी दादरमध्ये एका व्यंगचित्राच्या पुस्तकाचा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दोन्ही ठाकरे बंधू उपस्थित होते. दोघांनीही एकत्रितपणे हजेरी लावली होती. त्यानंतर भाजप नेत्याने आता ठाकरे बंधूना थेट बुक फेस्टिव्हलचं निमंत्रण दिल्याने त्याचे अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत.

Follow Us
गोकुळनंतर आता वारणा दूध संघाचाही मोठा निर्णय! दुधाचे दर वाढले...
गोकुळनंतर आता वारणा दूध संघाचाही मोठा निर्णय! दुधाचे दर वाढले, ग्राहकांना महागाईचा फटका
डिलिमिटेशनला विरोध नाही, पण दक्षिणेकडील राज्यांवर अन्याय नको...
डिलिमिटेशनला विरोध नाही, पण दक्षिणेकडील राज्यांवर अन्याय नको; पृथ्वीराज चव्हाणा यांसह इंडिया आघाडीची भूमिका स्पष्ट
मोठी बातमी! फडणवीस सरकारकडून शेतकरी कर्जमाफीची पहिली यादी जाहीर, तुमचं
मोठी बातमी! फडणवीस सरकारकडून शेतकरी कर्जमाफीची पहिली यादी जाहीर, 1.69 लाख शेतकऱ्यांना दिलासा
पुण्यात थंडीचा कडाका! पारा 11.3 अंशांवर, महाबळेश्वरलाही टाकलं मागे;
पुण्यात थंडीचा कडाका! पारा 11.3 अंशांवर, महाबळेश्वरलाही टाकलं मागे; राज्यभरातील हवामानाचा अंदाज...
अमरावतीत खळबळ! ठाकरे गटाच्या नगरसेवकाकडून सहाय्यक आयुक्तांना मारहाण...
अमरावतीत खळबळ! ठाकरे गटाच्या नगरसेवकाकडून सहाय्यक आयुक्तांना मारहाण, CCTV फुटेज समोर
महाराष्ट्रासाठी प्राणांची आहुती देणाऱ्या 106 हुतात्म्यांना अभिवादन...
महाराष्ट्रासाठी प्राणाची आहुती देणाऱ्या 106 हुतात्म्यांना अभिवादन; हुतात्मा चौकात CM देवेंद्र फडणवीसांकडून अभिवादन
जिममधील प्रोटीन पावडरबाबत तुकाराम मुंढेंचा मोठा निर्णय, आता लायसन्स अन
Tukaram Mundhe : जिममधील प्रोटीन पावडरबाबत तुकाराम मुंढेंचा मोठा निर्णय, आता लायसन्स अनिवार्य...
DCM एकनाथ शिंदेंच्या हस्ते विठ्ठल-रखुमाईची शासकीय महापूजा
पंढरीत विठ्ठल नामाचा गजर! DCM एकनाथ शिंदेंच्या हस्ते विठ्ठल-रखुमाईची शासकीय महापूजा
अभिजीत पाटलांना थेट मंत्रिपदाची ऑफर, भरत गोगावलेंचं विधान चर्चेत
Bharat Gogawale : अभिजीत पाटलांना थेट मंत्रिपदाची ऑफर, भरत गोगावलेंचं विधान चर्चेत
टाळ-मृदंगाचा गजर अन् विठ्ठल नामाचा जयघोष! कार्तिकी एकादशीला पंढरपूर...
टाळ-मृदंगाचा गजर अन् विठ्ठल नामाचा जयघोष! कार्तिकी एकादशीला पंढरपूर नगरी भक्तिरसात न्हाऊन निघाली