AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

या महाराष्ट्रात जोपर्यंत औरंगजेबाचं थडगं आहे तोपर्यंत… या नेत्याची राज्य सरकारकडे मोठी मागणी, काय होणार?

Anand Dave on Aurangzeb Tomb:  क्रूर मुघल शासक औरंगजेबाची कबर छत्रपती संभाजीनगरमधील खुलताबाद इथं आहे. 2024 मध्ये महायुतीचे सरकार आल्यापासून ही कबर हटवण्याची अनेकदा मागणी करण्यात आली आहे. आता हिंदू महासभेचे अध्यक्ष आनंद दवे यांनी सरकारकडे मोठी मागणी केली आहे.

या महाराष्ट्रात जोपर्यंत औरंगजेबाचं थडगं आहे तोपर्यंत... या नेत्याची राज्य सरकारकडे मोठी मागणी, काय होणार?
या महाराष्ट्रात जोपर्यंत औरंगजेबाचं थडगं आहे तोपर्यंत...
| Updated on: Nov 21, 2026 | 9:59 AM
Share

Anand Dave on Aurangzeb Tomb: मुघल शासक औरंगजेबाला महाराष्ट्राने गुडघ्यावर आणलं. मराठ्यांशी 20 वर्षे युद्धानंतरही तो पराभूतच राहिला. त्याचा मृत्यू अहिल्यानगरजवळील भिंगार इथं 3 मार्च 1707 रोजी झाला होता. पण त्याच्या इच्छेनुसार, गुरू सय्यद झैनुद्दीन शिराझी यांच्या खुलताबाद येथील दर्ग्याजवळ त्याचे दफन करण्यात आले. 2024 मध्ये महायुतीचे सरकार आल्यापासून ही कबर हटवण्याची अनेकदा मागणी करण्यात आली आहे. आता हिंदू महासभेचे अध्यक्ष आनंद दवे यांनी सरकारकडे मोठी मागणी केली आहे.

राज्यात औरंगजेब थडगं आहे तोपर्यंत

या महाराष्ट्रात जोपर्यंत औरंगजेब थडगं आहे तोपर्यंत औरंगजेब आणि टिपू सुलतानच्या जयंत्या, पुण्यतिथ्या साजऱ्या केल्या जाणार. त्यामुळे माझी महाराष्ट्र सरकारला विनंती आहे सर्वात आधी ते थडगं उध्वस्त करा, अशी मागणी हिंदू महासभेचे अध्यक्ष आनंद दवे यांनी सरकारकडे केली आहे. पुण्यात पोलिसांच्या उपस्थितीत नव्हे तर पोलिसांच्या परवानगीने टिपू सुलतानची जयंती साजरी करण्यात आली, त्यामुळे सर्वात आधी त्या पोलिसांवर गुन्हे दाखल करा अशी मागणी त्यांनी केली. आणि यापुढे औरंगजेब आणि टिपू सुलतानच्या जयंत्या, पुण्यतिथ्या साजऱ्या करणाऱ्यांवर राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करा, अशी मागणीही त्यांनी केली.

औरंगजेबाची कबर हटवण्याची मागणी

यापूर्वी महायुतीमधील मंत्र्यांनी औरंगजेबाची कबर हटवण्याची मागणी केली आहे. विश्व हिंदू परिषद, बजरंग दल, शिंदे सेना, भाजपचे मंत्री यांनी याविषयीची आक्रमक भूमिका मांडली आहे. छत्रपती संभाजी महाराज यांच्या सन्मानार्थ औरंगजेबाची कबर हटवण्याची मागणी सातत्याने करण्यात येत आहे. पण त्याला कायदेशीर पेच आहे. औरंगजेबाच्या कबरीला संरक्षित वास्तूचा दर्जा देण्यात आलेला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यापूर्वी कबरीचे उदात्तीकरण न होऊ देण्याची स्पष्ट भूमिका घेतली होती. संसदेच्या कायद्यानुसार तिचे संरक्षण होत असल्यामुळे कोणताही बदल अथवा कारवाई ही कायद्याच्या चौकटीतच करावी लागणार असे मुख्यमंत्र्यांनी त्यावेळी सांगितले होते.

मंत्री नितेश राणे यांनीही कबर हटवण्याची मागणी लावून धरलेली आहे. तर काही पुरोगामी संघटनांचा या मागणीला विरोध आहे. औरंगजेबाची कबर हटवल्यास भविष्यात कोणताच दाखला आणि पुरावा शिल्लक राहणार नाही. त्यामुळे इतिहासावर शंका उपस्थित करण्यास वाव मिळेल असे म्हणणे या संघटनांनी मांडले आहे. तर क्रूर औरंगजेबाचे उदातीकरण होणार नाही याची काळजी घेण्याचे आवाहनही काही मुस्लिम इतिहास संशोधकांनी केले आहे. आता पुन्हा हा विषय उकरण्यात आल्याने वाद पेटण्याची शक्यता आहे.

Follow Us
गोकुळनंतर आता वारणा दूध संघाचाही मोठा निर्णय! दुधाचे दर वाढले...
गोकुळनंतर आता वारणा दूध संघाचाही मोठा निर्णय! दुधाचे दर वाढले, ग्राहकांना महागाईचा फटका
डिलिमिटेशनला विरोध नाही, पण दक्षिणेकडील राज्यांवर अन्याय नको...
डिलिमिटेशनला विरोध नाही, पण दक्षिणेकडील राज्यांवर अन्याय नको; पृथ्वीराज चव्हाणा यांसह इंडिया आघाडीची भूमिका स्पष्ट
मोठी बातमी! फडणवीस सरकारकडून शेतकरी कर्जमाफीची पहिली यादी जाहीर, तुमचं
मोठी बातमी! फडणवीस सरकारकडून शेतकरी कर्जमाफीची पहिली यादी जाहीर, 1.69 लाख शेतकऱ्यांना दिलासा
पुण्यात थंडीचा कडाका! पारा 11.3 अंशांवर, महाबळेश्वरलाही टाकलं मागे;
पुण्यात थंडीचा कडाका! पारा 11.3 अंशांवर, महाबळेश्वरलाही टाकलं मागे; राज्यभरातील हवामानाचा अंदाज...
अमरावतीत खळबळ! ठाकरे गटाच्या नगरसेवकाकडून सहाय्यक आयुक्तांना मारहाण...
अमरावतीत खळबळ! ठाकरे गटाच्या नगरसेवकाकडून सहाय्यक आयुक्तांना मारहाण, CCTV फुटेज समोर
महाराष्ट्रासाठी प्राणांची आहुती देणाऱ्या 106 हुतात्म्यांना अभिवादन...
महाराष्ट्रासाठी प्राणाची आहुती देणाऱ्या 106 हुतात्म्यांना अभिवादन; हुतात्मा चौकात CM देवेंद्र फडणवीसांकडून अभिवादन
जिममधील प्रोटीन पावडरबाबत तुकाराम मुंढेंचा मोठा निर्णय, आता लायसन्स अन
Tukaram Mundhe : जिममधील प्रोटीन पावडरबाबत तुकाराम मुंढेंचा मोठा निर्णय, आता लायसन्स अनिवार्य...
DCM एकनाथ शिंदेंच्या हस्ते विठ्ठल-रखुमाईची शासकीय महापूजा
पंढरीत विठ्ठल नामाचा गजर! DCM एकनाथ शिंदेंच्या हस्ते विठ्ठल-रखुमाईची शासकीय महापूजा
अभिजीत पाटलांना थेट मंत्रिपदाची ऑफर, भरत गोगावलेंचं विधान चर्चेत
Bharat Gogawale : अभिजीत पाटलांना थेट मंत्रिपदाची ऑफर, भरत गोगावलेंचं विधान चर्चेत
टाळ-मृदंगाचा गजर अन् विठ्ठल नामाचा जयघोष! कार्तिकी एकादशीला पंढरपूर...
टाळ-मृदंगाचा गजर अन् विठ्ठल नामाचा जयघोष! कार्तिकी एकादशीला पंढरपूर नगरी भक्तिरसात न्हाऊन निघाली