AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Aishwarya Rai Emotional Post: लेकीच्या वाढदिवसाच्या 5 दिवसांनंतर ऐश्वर्याने केलं तरी काय? पोस्ट पाहून म्हणाल…

Aishwarya Rai Emotional Post: अभिनेत्री ऐश्वर्या राय हिची पोस्ट सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. अशात ऐश्वर्याने हिने लेकीच्या वाढदिवसाच्या पाच दिवसांनंतर खास पोस्ट केल्यामुळे चर्चेत आली आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त ऐश्वर्या राय हिच्या पोस्टची चर्चा रंगली आहे.

Aishwarya Rai Emotional Post: लेकीच्या वाढदिवसाच्या 5 दिवसांनंतर ऐश्वर्याने केलं तरी काय? पोस्ट पाहून म्हणाल...
Aishwarya Rai
| Updated on: Nov 21, 2026 | 9:46 AM
Share

Aishwarya Rai Emotional Post: अभिनेत्री ऐश्वर्या राय आता पूर्वीप्रमाणे बॉलिवूडमध्ये सक्रिय नसली तरी, कोणत्या न कोणत्या कारणामुळे कायम चर्चेत असते. बॉलिवूडपासून दूर असली तरी, चाहत्यांमध्ये ऐश्वर्याची क्रेझ कायम आहे. मोठ्या पडद्यावर सक्रिय नसली तरी, ऐश्वर्या सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांसोबत संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असते. आता ऐश्वर्या हिने लेक आराध्या बच्चन आणि आई – वडिलांसोबत एक फोटो पोस्ट करत खास कॅप्शन देखील लिहिलं आहे.

मध्यरात्री ऐश्वर्या हिने इन्स्टाग्रामवर कुटुंबासोबत एक फोटो पोस्ट केला. फोटो ब्लॅर असला तरी, कुटुंबातील प्रेम दिसून येत आहे. फोटोमध्ये ऐश्वर्या हिला कडेवर घेतलं आहे. तर तिच्या बाजूला तिचे आई – वडील आहे. ऐश्वर्या हिने आराध्या हिच्या लहानपणीचा फोटो पोस्ट करत वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहे.

सांगायचं झालं तर, 16 नोव्हेंबर रोजी आराध्या हिच्या वाढदिवस होता आणि 5 दिवसांनंतर ऐश्वर्या हिने फोटो पोस्ट केले आहेत. आई – वडील आणि आराध्या हिच्यासोबत फोटो पोस्ट करत ऐश्वर्या म्हणाते, ‘वाढदिवसाच्या शुभेच्छा प्रिया डॅडी आणि अज्जा… माझी एन्जल आराध्या…’, असं म्हणते अभिनेत्रीने प्रेम व्यक्त केलं आहे.

आराध्याच्या क्यूटनेसवर चाहते फिदा

ऐश्वर्या रायने लेक आराध्या आणि आपल्या पालकांसाठी शेअर केलेली प्रेमळ पोस्ट सोशल मीडियावर चांगलीच चर्चेत आली आहे. चाहते त्यांच्यावर प्रेमाचा वर्षाव करत आहेत आणि कमेंट सेक्शनमध्ये आराध्याला आशीर्वाद देत आहेत. आराध्या बच्चनचा गोंडसपणाही सर्वांची मने जिंकत आहे; लहानपणापासून आतापर्यंत तिच्या लूक मध्ये खूप मोठा बदल झाला आहे.

ऐश्वर्या हिच्याबद्दल सांगायचं झालं तर, एक काळ असा होता जेव्हा ऐश्वर्या हिने बॉलिवूडवर राज्य केलं होतं. बॉलिवूडमध्ये स्वतःची ओळख भक्कम करत असताना, ऐश्वर्या तिच्या खासगी आयुष्यामुळे देखील चर्चेत आलेली. अखेर ऐश्वर्या हिने अभिनेता अभिषेक बच्चन याच्यासोबत लग्न केलं. 2007 मध्ये ऐश्वर्या – अभिषेक यांना लग्न केलं. तर 2011 मध्ये ऐश्वर्या हिने लेक आराध्या हिला जन्म दिला. आज ऐश्वर्या तिच्या खासगी आयुष्यात आनंदी आहे.

Follow Us
डिलिमिटेशनला विरोध नाही, पण दक्षिणेकडील राज्यांवर अन्याय नको...
डिलिमिटेशनला विरोध नाही, पण दक्षिणेकडील राज्यांवर अन्याय नको; पृथ्वीराज चव्हाणा यांसह इंडिया आघाडीची भूमिका स्पष्ट
मोठी बातमी! फडणवीस सरकारकडून शेतकरी कर्जमाफीची पहिली यादी जाहीर, तुमचं
मोठी बातमी! फडणवीस सरकारकडून शेतकरी कर्जमाफीची पहिली यादी जाहीर, 1.69 लाख शेतकऱ्यांना दिलासा
पुण्यात थंडीचा कडाका! पारा 11.3 अंशांवर, महाबळेश्वरलाही टाकलं मागे;
पुण्यात थंडीचा कडाका! पारा 11.3 अंशांवर, महाबळेश्वरलाही टाकलं मागे; राज्यभरातील हवामानाचा अंदाज...
अमरावतीत खळबळ! ठाकरे गटाच्या नगरसेवकाकडून सहाय्यक आयुक्तांना मारहाण...
अमरावतीत खळबळ! ठाकरे गटाच्या नगरसेवकाकडून सहाय्यक आयुक्तांना मारहाण, CCTV फुटेज समोर
महाराष्ट्रासाठी प्राणांची आहुती देणाऱ्या 106 हुतात्म्यांना अभिवादन...
महाराष्ट्रासाठी प्राणाची आहुती देणाऱ्या 106 हुतात्म्यांना अभिवादन; हुतात्मा चौकात CM देवेंद्र फडणवीसांकडून अभिवादन
जिममधील प्रोटीन पावडरबाबत तुकाराम मुंढेंचा मोठा निर्णय, आता लायसन्स अन
Tukaram Mundhe : जिममधील प्रोटीन पावडरबाबत तुकाराम मुंढेंचा मोठा निर्णय, आता लायसन्स अनिवार्य...
DCM एकनाथ शिंदेंच्या हस्ते विठ्ठल-रखुमाईची शासकीय महापूजा
पंढरीत विठ्ठल नामाचा गजर! DCM एकनाथ शिंदेंच्या हस्ते विठ्ठल-रखुमाईची शासकीय महापूजा
अभिजीत पाटलांना थेट मंत्रिपदाची ऑफर, भरत गोगावलेंचं विधान चर्चेत
Bharat Gogawale : अभिजीत पाटलांना थेट मंत्रिपदाची ऑफर, भरत गोगावलेंचं विधान चर्चेत
टाळ-मृदंगाचा गजर अन् विठ्ठल नामाचा जयघोष! कार्तिकी एकादशीला पंढरपूर...
टाळ-मृदंगाचा गजर अन् विठ्ठल नामाचा जयघोष! कार्तिकी एकादशीला पंढरपूर नगरी भक्तिरसात न्हाऊन निघाली
रत्नागिरीत गोवा बनावटीच्या दारूचा तब्बल 1.75 कोटींचा साठा जप्त....
Ratnagiri Liquor Seizure : रत्नागिरीत गोवा बनावटीच्या दारूचा तब्बल 1.75 कोटींचा साठा जप्त; हातखंबा येथे उत्पादन शुल्क विभागाची कारवाई