
बॉलिवूड अभिनेत्री सोनम कपूर लवकरच आई होणार आहे. सध्या ती तिचा प्रेग्नेंसी पीरियड एन्जॉय करत आहे. आज सोनमचा वाढदिवस देखील आहे, या निमित्ताने तिने एक फोटोशूट केले आहे ज्यामध्ये तिने बेबी बंप फ्लॉंटकरत काढलेले फोटो पोस्ट केले आहेत.

तिचे हे फोटो चाहत्यांच्या चांगलेच पसंतीस उतरले आहेत. या फोटोमध्ये तिने तिने पांढरा सॅटिनचा आऊटफीट कॅरी केलं आहे. ज्यामध्ये ती कमालीची सुंदर दिसत आहे.

सोनम कपूरच्या पोस्टवर फॅशन डिझायनर अबू जानी दीपने लिहिले आहे की , 'आम्ही या महिलेवर खूप प्रेम करतो. फॅशनची तिची आवड तिला नेहमीच गेम चेंजर बनवते. तू लवकरच आई होणार आहेस. या प्रवासासाठी तुला खूप खूप शुभेच्छा. सोनम कपूरच्या या लेटेस्ट फोटोशूटने हे सिद्ध केले आहे. गरोदरपणातही तुम्ही फॅशनचा आनंद घेऊ शकता

सोनम कपूरने यापूर्वी मॅटर्निटी शूट केले आहे. या काळात प्रत्येक दिवस तुमच्यासाठी नवीन असतो. प्रत्येक अनुभव तुम्हाला मुलाच्या जवळ आणतो. मात्र, आई होण्याचा हा प्रवास तितका सोपा नाही. तुमचे शरीर दर आठवड्याला, दररोज बदलते असे तिने म्हटले आहे.

सोनम कपूरच्या या फोटोवर चाहत्यांनीही भरभरून कमेंट केल्या आहेत. या एका युझरने 'कितनी सुंदर लग रही हो' अशी कमेंट केली आहे.

बॉलीवूडमधील कलाकारांनीही तिच्या या पोस्ट कमेंट करत तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसने ब्युटीफुल्ल असे लिहिते हार्टच्या इमोजी शेअर केल्या आहेत.