
अभिनेत्री सोनम कपूर (Sonam Kapoor) आज 36 वर्षांची झाली आहे. गेल्या काही काळापासून अभिनेत्री पती आनंद आहुजासमवेत लंडनमध्ये राहत होती. या दरम्यान त्यांनी आपले खास फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. यूकेतील सोहो फार्महाऊस मधील हा फोटो त्या दोघांचाही फॅशन सेन्स दिसत आहे.

गेल्या आठवड्यात आनंदने आपल्या सोशल मीडियावर थ्रोबॅक फोटो सीरीज शेअर केली होती, ज्यामध्ये हे दिसून आले की, या जोडीला आपल्याच स्टाईलमध्येच फिरणे किती आवडते.

या फोटोत या जोडीने परिधान केलेले ब्लॅक ड्रेसेस फॅशनप्रेमींसाठी निश्चितच प्रेरणास्थान आहे. यात सोनमने ब्लॅक ब्लेझरसह मेटल चोकर परिधान केला होता. तर, आनंद देखील ब्लॅक पँटसह ब्लॅक स्वेटशर्ट परिधान केला होता.

लॉस एंजेलिसमधील रुन्यॉन कॅनियन पार्कमध्ये हायकिंग करून दोघांनी एकत्र कसरत केली.

गेल्या वर्षीच्या हॅलोविन पार्टीमध्ये आनंद आहुजा आणि सोनं कपूर यांनी 'सलीम-अनारकली' यांची वेशभूषा परिधान केली होती.

या फोटोद्वारे आनंद आहुजा याने पत्नी सोनम बद्दलचे प्रेम व्यक्त केले आहे. ज्यात त्याने सोनमचे वर्णन प्रेयसी, जिवलग मैत्रीण, पत्नी, जीवनसाथी म्हणून केले आहे.