Photos : हार्दिकच्या गर्लफ्रेंडचा स्वॅग, थेट बिकिनीवरील फोटो केले पोस्ट; सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल!
मुंबई इंडियन्स संघातून पंजाबमध्ये एन्ट्री झालेल्या क्रिकेटपटू हार्दिक पंड्याची गर्लफ्रेंड माहिका शर्मा पुन्हा एकदा सोशल मीडियावर चर्चेत आली आहे. माहिकाने इन्स्टाग्राम स्टोरीवर शेअर केलेल्या एका फोटोने चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.

टीम इंडियाचा क्रिकेटपटू हार्दिक पंड्याची गर्लफ्रेंड माहिका शर्मा पुन्हा एकदा तिच्या बोल्ड अंदाजामुळे चर्चेत आली आहे. सोशल मीडियावर ती नेहमीच तिच्या स्टायलिश आणि ग्लॅमरस फोटोंमुळे लक्ष वेधून घेत असते.
माहिकाने नुकताच तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर बिकिनीमधील एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये तिचा फिटनेस आणि टोन्ड फिगर पाहायला मिळत आहे. तिच्या या फोटोची सोशल मीडियावर चर्चा सुरू आहे.
सध्या माहिका बंगळुरूमध्ये असून तिथले वातावरण तिला खूप आवडल्याचे तिने पोस्टमधून सांगितले आहे. याचदरम्यान तिने वॉशरूममधील आरशासमोर उभे राहून मिरर सेल्फी घेतला आहे. पांढऱ्या रंगाच्या बिकिनीतील तिचा फोटो लक्ष वेधून घेत आहे.
माहिका शर्मा प्रचंड फेमस मॉडेल आहे. ती अनेकदा इन्स्टाग्रामवर बिकिनीमधील फोटो शेअर करत असते. तिच्या फिटनेसचे चाहतेही कौतुक करतात. हार्दिक पंड्यासोबतचे तिचे रोमँटिक फोटोही याआधी अनेकदा व्हायरल झाले आहेत.
नताशा स्टॅनकोविचपासून विभक्त झाल्यानंतर हार्दिकच्या आयुष्यात माहिकाची एन्ट्री झाली. दोघांची केमिस्ट्री सोशल मीडियावर चर्चेचा विषय असते. विशेष म्हणजे हार्दिकचा मुलगा अगस्त्यसोबतही माहिकाचे चांगले नाते आहे. अगस्त्यची काळजी घेतानाचे तिचे फोटोही याआधी समोर आले आहेत. त्यामुळे दोघांच्या या बॉन्डिंगचीही चर्चा होत असते.
सर्व फोटो सौजन्य- हार्दिक पंड्या आणि माहिका शर्मा इन्स्टाग्राम पेज