पडद्यावर मायाळू सासूची भूमिका गाजवली, पण खऱ्या आयुष्यात लग्नापासून दूर राहिली ‘ही’ मराठी अभिनेत्री

पडद्यावर प्रेमळ सासूची भूमिका साकारून घराघरात लोकप्रिय झालेली ही मराठी अभिनेत्री खऱ्या आयुष्यात मात्र आजही अविवाहित आहे. वयाची 53 वर्षे पूर्ण होऊनही तिने लग्न का केले नाही? विशेष म्हणजे, लहानपणी तिलाही लग्न करण्याची इच्छा होती. मग कोण आहे ही लोकप्रिय अभिनेत्री? जाणून घ्या तिच्या वैयक्तिक आयुष्याचा रंजक किस्सा!

| Updated on: Oct 31, 2026 | 10:03 AM
1 / 6
मराठी मनोरंजन क्षेत्रात अशा अनेक अभिनेत्री आहेत ज्यांनी आपल्या अभिनय कौशल्याने प्रेक्षकांच्या मनात खास जागा निर्माण केली आहे. टीव्ही मालिकांमध्ये कधी प्रेमळ सासू तर कधी आई अशा भूमिका साकारून त्यांनी प्रेक्षकांची मने जिंकली. पडद्यावर नात्यांमधील गोडवा जपणाऱ्या या अभिनेत्रींच्या खऱ्या आयुष्यातील गोष्टी मात्र तितक्याच रोमांचक आणि रंजक आहेत.

मराठी मनोरंजन क्षेत्रात अशा अनेक अभिनेत्री आहेत ज्यांनी आपल्या अभिनय कौशल्याने प्रेक्षकांच्या मनात खास जागा निर्माण केली आहे. टीव्ही मालिकांमध्ये कधी प्रेमळ सासू तर कधी आई अशा भूमिका साकारून त्यांनी प्रेक्षकांची मने जिंकली. पडद्यावर नात्यांमधील गोडवा जपणाऱ्या या अभिनेत्रींच्या खऱ्या आयुष्यातील गोष्टी मात्र तितक्याच रोमांचक आणि रंजक आहेत.

2 / 6

एक लोकप्रिय मराठी अभिनेत्री वयाच्या 53 व्या वर्षीही अजून अविवाहित आहे. लहानपणापासूनच तिच्या मनात लग्नाची इच्छा होती, पण आजतागायत तिने लग्न केलेले नाही. ही अभिनेत्री कोण आहे?

3 / 6

हर्षदा खानविलकर म्हणजेच ‘लक्ष्मीनिवास’ मालिकेतील लक्ष्मी. तिच्या प्रभावी अभिनयाने तिने प्रेक्षकांच्या मनात खास जागा निर्माण केली. सध्या 53 वर्षांच्या असलेल्या हर्षदाने अजूनही विवाह केलेला नाही. लहानपणी मात्र तिला लग्न करायची तीव्र इच्छा होती.

4 / 6

हर्षदा खानविलकरने अलीकडेच एका मुलाखतीत आपल्या बालपणाबद्दल बोलताना आई-वडिलांबद्दलच्या भावना व्यक्त केल्या. तिने एका मुलाखतीत या मुलाखतीत सांगितले की, लहानपणी तिला कधीही मोठी स्वप्ने पडली नव्हती. फक्त लग्न करायचे इतकेच तिला माहित होते. मात्र हळूहळू कामाच्या माध्यमातून नवनवीन स्वप्ने येऊ लागली आणि गेल्या काही वर्षांत तिने त्याशिवाय दुसरे कोणतेही स्वप्न पाहिलेले नाही.

5 / 6

हर्षदा म्हणाली, “भरपूर काम करणे, ज्यातून आनंद मिळेल असे काम करणे, मजेदार लोकांसोबत काम करणे आणि आई-वडिलांचा आशीर्वाद असणे हे सगळं माझ्या आयुष्यात मला मिळतंय.” पुढे ती म्हणाली, “मला नेहमी असं वाटतं की लोक खूप काम शोधत असतात, त्यांना मोठी स्वप्नं असतात. माझ्या आयुष्यात खूप चांगले माणसं आहेत. पण मला असं वाटतं की मी खरंच कधी मोठी स्वप्नं पाहिलीच नाहीत. आयुष्य आपोआप घडतंय पुढे असं होईल किंवा तसं होईल, हे मी कधी ठरवलं नाही.”

6 / 6

मी शैक्षणिकदृष्ट्याही फारशी हुशार नव्हते. डान्स किंवा स्पोर्ट्सकडे लक्ष द्यायचं असं कधीच वाटलं नाही. आमची आर्थिक स्थितीही तशी नव्हती की अशा गोष्टींना प्रोत्साहन मिळेल. मुळातच आमच्यात तो टॅलेंटच नव्हता, त्यामुळे पालकांनाही तो कसा जोपासायचा हे कळत नव्हतं.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us