क्रिकेटर अक्षर पटेल याच्याकडे आहेत या शानदार कार, कोट्यवधी रुपयांचे कलेक्शन

भारतीय क्रिकेट संघाचा स्टार खेळाडू अक्षर पटेल याच्या संघातील कामगिरीचे चाहते फॅन आहेत. मात्र, त्याच्या संग्रहात आलिशान कारची नावे तुम्हाला माहिती आहेत का ?

| Updated on: Mar 24, 2026 | 9:01 PM
1 / 5
अक्षर पटेल यांना कारची विशेषत: सुव्हची आवड आहे. रंगबिरंगी फॅन्सी कार ऐवजी त्याची पसंती मजबूतीला आहे.त्याचे जीवनशैलीचे प्रतिक त्याच्या कार कलेक्शनमध्येही दिसते.

अक्षर पटेल यांना कारची विशेषत: सुव्हची आवड आहे. रंगबिरंगी फॅन्सी कार ऐवजी त्याची पसंती मजबूतीला आहे.त्याचे जीवनशैलीचे प्रतिक त्याच्या कार कलेक्शनमध्येही दिसते.

2 / 5

लँड रोव्हर डिस्कव्हरी ही अक्षर पटेलची सर्वात प्रसिद्ध कार आहे. ही एसयुव्ही त्याच्या सुरुवातीच्या लक्झरी कारपैकी मानली जाते. मजबूती, शक्तीशाली इंजिन आणि एअर सस्पेंशनसारख्या वैशिष्ट्यांमुळे ही कार सर्वप्रकारच्या रस्त्यासाठी बेस्ट आहे. ही कार शक्ती आणि आराम यांचा सुंदर संगम आहे.

3 / 5

अक्षर पटेल याच्या गॅरेजमधील सर्वात आलिशान कार म्हणजे रेंज रोव्हर ऑटोबायोग्राफी होय. ही एसयूव्ही तिच्या वैशिष्ट्यांमुळे आणि आरामदायीपणासाठी जगभरात ओळखली जाते. तिचे इंटेरिअर आणि टेक्नॉलॉजी इतकी प्रगत आहे यातून प्रवास करणे हा एक वेगळाच अनुभव ठरतो. या कारकडे प्रतिष्ठेचे प्रतीक म्हणूनही पाहिले जाते.

4 / 5

क्रिकेटर अक्षर पटेल याच्या संग्रहात आलिशान मर्सिडीज-बेंझ AMG GLA35 देखील आहे. ही कार तिचा स्पोर्टी लूक आणि वेगवान पिकअपसाठी ओळखली जाते. शहरात कार चालवण्यासाठी हा उत्तम पर्याय मानली जाते.

5 / 5

अक्षर पटेल याच्याकडे कमी कार असल्या तरी ज्या कार आहेत त्या अत्यंत मजबूत आणि आरामदायी आहेत. त्याच्या गॅरेजमधील प्रत्येक कार त्याच्या व्यक्तीमत्वाचा आगळा पैलू दर्शवते.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us