
वजन कमी करणाऱ्या सेलिब्रिटी किंवा फिटनेस कोच यांच्याकडून आपण अनेक वेळा कॅलरी डेफिसिट शब्द काणावर पडला असेल.तर काही लोक असेही असतील की या शब्दाचा अर्थ माहिती नाही.

कॅलरी डेफिसिट म्हणजे आपण रोज जेवणातून जितक्या कॅलरी घेतो, त्यापेक्षा जास्त कॅलरी शरीर रोजच्या हालचालींमधून आणि व्यायामातून कमी होतात.

तेव्हा त्या स्थितीला कॅलरी डेफिसिट म्हणतात.सोप्या शब्दांत सांगायचं तर, कमी कॅलरी घेणे + जास्त कॅलरी बन करणे, कॅलरी डेफिसिटकॅलरी डेफिसिटमध्ये शरीराला आवश्यक ऊर्जा मिळवण्यासाठी साठवलेली चरबी जाळावी लागते, त्यामुळे हळूहळू वजन कमी होत.

जर तुम्हाला वजन कमी करायचे असेल तर मर्यादीत प्रमाणात कॅलरी घ्या किंवा एखाद्या दिवशी कॅलरी जास्त असलेले पदार्थ खाल्ले तर तेवढ्या कॅलरी खर्च करा. ज्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते.

शिवाय तुम्ही चालून सुद्धा कॅलरी बन कमी करू शकता.वजन कमी करण्यासाठी सर्वात महत्वाचे आहे की, जास्तीत जास्त व्यायाम करा आणि कमी कॅलरी असलेले पदार्थ खा.