
वाढलेले वजन कमी करण्यासाठी सर्वात महत्वाचे असते तुम्ही नाश्त्यामध्ये काय खाता. नाश्ता आणि सकाळी उठल्यानंतर निरोगी राहण्यासाठी खास पेय प्या.

जर तुम्हाला निरोगी राहायचे असेल तर सकाळी उठल्यावर सर्वात अगोदर तुम्ही कोमट पाणी घ्या आणि त्यामध्ये लिंबू आणि मध मिक्स करून घ्या.

हे पाणी उपाशी पोटी प्या, ज्यामुळे आरोग्याच्या असंख्य समस्या दूर होण्यास मदत होते. शिवाय यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यासही मदत होते.

जर तुम्हाला मुळव्याधाचा त्रास होत असेल तर अशावेळी रात्री पाण्यात सब्जा भिजत घाला आणि त्याचे पाणी प्या. यामुळेही काही समस्या दूर होतात.

सब्जा घातलेले पाणी पिले तर मुळव्याध होत नाही. शिवाय आपण बीटचा जास्तीत जास्त आहारात समावेश करावा, ज्यामुळे मुळव्याध दूर होतो.