जेवल्यानंतर सुस्ती उडवण्यासाठी चहा किंवा कॉफी पिणे योग्य की अयोग्य? तज्ज्ञ काय सांगतात?

जेवणानंतर चहा किंवा कॉफी पिणे आरोग्यासाठी नुकसानकारक का आहे, याचे सविस्तर वैज्ञानिक स्पष्टीकरण आणि योग्य वेळेबद्दलची माहिती या बातमीत वाचा.

| Updated on: Feb 17, 2026 | 4:32 PM
1 / 6
अनेकांना दुपारच्या किंवा रात्रीच्या जेवणानंतर वाफाळलेला चहा किंवा कॉफी पिण्याची सवय असते. काहींच्या मते यामुळे अन्न पचायला मदत होते, तर काहींना जेवणानंतर येणारी सुस्ती घालवण्यासाठी हे पेय हवे असते. मात्र, वैद्यकीय शास्त्रानुसार ही सवय तुमच्या आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकते.

अनेकांना दुपारच्या किंवा रात्रीच्या जेवणानंतर वाफाळलेला चहा किंवा कॉफी पिण्याची सवय असते. काहींच्या मते यामुळे अन्न पचायला मदत होते, तर काहींना जेवणानंतर येणारी सुस्ती घालवण्यासाठी हे पेय हवे असते. मात्र, वैद्यकीय शास्त्रानुसार ही सवय तुमच्या आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकते.

2 / 6

चहामध्ये 'टॅनिन' (Tannin) नावाचे घटक असतात. हे घटक अन्नातील लोहाशी संयोग पावतात, ज्यामुळे शरीर अन्नातील लोह शोषून घेऊ शकत नाही. जर तुम्ही रोज जेवणानंतर लगेच चहा पीत असाल, तर शरीरात लोहाची कमतरता निर्माण होऊन ॲनिमिया होऊ शकतो.

3 / 6

विशेषतः शाकाहारी लोकांसाठी हे अधिक नुकसानकारक आहे. चहा आणि कॉफीमध्ये असलेले कॅफिन पोटातील ॲसिडचे प्रमाण वाढवते. जेवणानंतर लगेच चहा घेतल्याने छातीत जळजळ होऊ शकते.

4 / 6

चहामधील 'थियोफिलाइन' (Theophylline) नावाचा घटक बद्धकोष्ठतेची समस्या निर्माण करू शकतो. अन्नातील प्रथिने (Proteins) पचायला कठीण होतात, ज्यामुळे पोट फुगल्यासारखे वाटते.

5 / 6

जेवणानंतर लगेच कॉफी घेतल्यास रक्ताभिसरण वाढते. ज्यामुळे तात्पुरता उच्च रक्तदाब (High Blood Pressure) वाढू शकतो. तसेच, रात्रीच्या जेवणानंतर चहा-कॉफी घेतल्यास त्यातील कॅफिनमुळे झोप उडते, ज्याचा परिणाम दुसऱ्या दिवशीच्या आरोग्यावर होतो.

6 / 6

आरोग्य तज्ज्ञांच्या मते, जर तुम्हाला चहा किंवा कॉफी टाळता येत नसेल, तर जेवण झाल्यानंतर किमान ४५ मिनिटे ते १ तासाने त्याचे सेवन करावे. यामुळे अन्नातील पोषक घटक शरीरात शोषले जाण्यास पुरेसा वेळ मिळतो.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us