
हिवाळा म्हटले की, बाजारात चांगले ताजे आणि मस्त वाटाणे येते. बरेच लोक बाजारातून ताजे वाटाणे आणतात आणि फ्रीजरमध्ये काही महिन्यांसाठी स्टोर करून ठेवतात. ज्यामुळे त्याचा वापर हवा तेव्हा करता येतो.

हिवाळ्याच्या महिन्यांत वाटाण्याचे पीक मोठ्या प्रमाणात घेतले जाते. फक्त वाटाणे ही चवीसाठीच नाही तर आपल्या आरो्यासाठीही अत्यंत फायदेशीर आहेत.

दररोजच्या आहारात वाटाण्याचा समावेश केल्याने अनेक आरोग्य समस्या दूर होतात. जर तुम्ही वजन कमी करण्यासाठी प्रयत्न करत असाल तर ते फायदेशीर आहे.

त्यामध्ये व्हिटॅमिन ए, सी, के आणि बी-कॉम्प्लेक्स यांसारखी जीवनसत्त्वे, तसेच लोह, मॅग्नेशियम आणि पोटॅशियम यांसारखी खनिजे भरपूर प्रमाणात असतात.

विशेष म्हणजे सलादमध्येही वाटाण्याचा समावेश करा. वाटाण्यांना थोडे फ्राय करून घ्या आणि त्यामध्ये कांदा, हिरवी मिरर्ची आणि पनीर मिक्स करून खा.