
इंडियन आयडल 12 हा सध्या टीव्हीवरील सर्वात यशस्वी शो आहे. या शोनं ए.आर. रहमान, जया प्रदा, आनंदजी, जितेंद्र, एकता कपूर, धर्मेंद्र, हेमा मालिनी, रेखा आणि नीतू कपूर यांच्यासह अनेक नामांकित सेलिब्रिटी पाहुण्यांना जोडून ठेवलं.

अरुणिता कांजिलाल, पवनदीप राजन, सवाई भट्ट या सारख्या स्पर्धकांनी त्यांच्या मधुर आणि भावपूर्ण आवाजानं अनेकांना प्रभावित केलंय. शोच्या सर्व स्पर्धकांनी अगदी सुरुवातीपासूनच सर्वांची मनं जिंकली आहेत.

या हंगामात आदित्य नारायण हा या कार्यक्रमाचं होस्टिंग करतोय. जज पॅनेलसह प्रेक्षकांची मनं तो जिंकतोय. नेहा कक्कर, विशाल आणि हिमेश रेशमिया सुरुवातीपासूनच या शोसाठी जज आहेत.

बॉलिवूड लाइफच्या मते या जजच्या मानधनाबद्दल बोलायचं झालं तर नेहा कक्कर सर्वात जास्त शुल्क घेणाऱ्यांपैकी एक आहे. ती एका एपिसोडसाठी 5 लाख रुपये घेते.

आपल्या विनोदांनी सर्वांना आनंदीत करताना दिसणारे विशाल दादलानी एका एपिसोडसाठी 4.50 लाख रुपये घेतात. त्याचवेळी, हिमेश रेशमिया एका एपिसोडसाठी 4 लाख रुपये घेतात आणि शो होस्ट आदित्य नारायण 2.5 लाख रुपये घेतात.

कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे गेल्या काही आठवड्यांमध्ये काही मोठे बदल आपल्याला पाहायला मिळाले आहेत. आता नेहा कक्कर आणि हिमेश रेशमिया यांनी पुन्हा शूटिंग सुरू केलं असून ते लवकरच शोमध्ये दिसतील.

आदित्य नारायणही कोरोनाला हारवत पुन्हा सावरला आहे. तो आता शोमध्ये परतला आहे.