मुंबईत पावसाचा कहर! रस्ते जलमय, लोकांच्या घरात शिरले पाणी,थेट गुडघाभर पाण्यात..
Mumbai Red Alert : राज्यात सर्वदूर पाऊस कोसळत आहे. त्यामध्येच भारतीय हवामान विभागाने अनेक जिल्ह्यांमध्ये रेड अलर्ट जारी केला. मुंबईत पावसाचा वेग प्रचंड वाढला आहे. लोकांच्या घरात पाणी साचले आहे.

मुंबईमध्ये जोरदार पाऊस सुरू आहे. या पावसाने चांगलीच दणादण उडालीये. अनेक भागात पाणी साचले आहे. सखल भाग जलमय झाली आहेत. आज मुंंबईकरिता पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आला. पाऊस काही थांबण्याचे नाव घेत नाही.

प्रशासनाकडून नागरिकांना अतिमहत्वाच्या कामाशिवाय घराबाहेर न पडण्याच्या सूचना देण्यात आल्या. काल रात्रीपासून सतत पाऊस सुरू आहे. सूर्याचे साधे दर्शनही झाले नाही.

मुंबईतील चांदिवलीत रस्ते जलमय झालेत. रस्त्यांना नदीचं स्वरूप प्राप्त झाले. मनसेचे नेते महेंद्र भानुशाली यांनी भरलेल्या पाण्यात टायर ट्यूब टाकून महापौरांना जाब विचारला आहे.

भर पाण्यात मनसेचे नाले सफाई आणि मनपा कंत्राटदारांविरोधात आंदोलन सुरू झाले मुंबई महापालिकेच्या महापाैर रितू तावडे या देखील रस्त्यावर उतरल्याचे बघायला मिळतंय.

जागोजागी महापालिकेचे कर्मचारी दिसत आहेत. मुंबईत पावसाचा वेग वाढल्याचे बघायला मिळत आहे. मुंबईत शाळांना सुट्टी देखील जाहीर करण्यात आली. रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने नागरिकांना मोठ्या समस्या येत आहेत.

पुढील काही तासात पावसाचा वेग वाढ्ण्याचे संकेत आहेत. आज मुंबईत अतिमुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला. 6 जुलैपर्यंत राज्यात पाऊस आहे. मुंबईसह उपनगरांमध्ये पाऊस सुरू आहे. स्टेशनबाहेरही गुडघाभर पाणी साचले. लोकांच्या घरात पाणी शिरले आहे.