AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शिंदे गटातील मुख्यनेता पदामुळे घोळ होणार? कपिल सिब्बल यांच्या युक्तिदामुळे फटका बसणार; कोर्टात काय म्हणाले?

शिंदे यांच्यासह काही आमदारांनी बंडखोरी केल्यानंतर शिंदे यांना पक्षाचे मुख्यनेतेपद देण्यात आले होते. यावरच कोर्टात ठाकरे गटाने शिंदे गटाला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला. न्यायालयाने हा युक्तिवाद ग्राह्य धरला तर शिंदे गटाची अडचण होऊ शकते.

शिंदे गटातील मुख्यनेता पदामुळे घोळ होणार? कपिल सिब्बल यांच्या युक्तिदामुळे फटका बसणार; कोर्टात काय म्हणाले?
eknath shinde and uddhav thackeray and shivsena hearing in supreme courtImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Aug 18, 2026 | 6:48 PM
Share

Shivsena UBT Supreme Court Hearing : शिवसेना पक्ष आणि निवडणूक चिन्ह याबाबत सध्या सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. सध्या ठाकरे गटाचा युक्तिवाद सुरू आहे. ठाकरेंचा युक्तिवाद संपल्यानंतर शिंदे गटातर्फे बाजू मांडली जाणार आहे. त्याआधी ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल हे ठाकरे गटाची बाजू मांडत आहेत. त्यांच्या अभ्यासपूर्ण मांडणीमुळे सर्वोच्च न्यायालयालाही काही गोष्टींची दखल घ्यावी लागत आहे. दरम्यान, आतापर्यंत चार वेळा सिब्बल यांनी आपला युक्तिवाद केला. त्यानंतर सिब्बल हे पाचव्यांदा ठाकरेंची बाजू मांडत आहेत. आजच्या युक्तिवादात सिब्बल यांनी शिंदे गटाने घेतलेल्या काही निर्णयांवर तसेच निर्माण केलेल्या मुख्य नेतेपदावरच गंभीर प्रश्न उपस्थित केले.

पक्षाच्या घटनेत मुख्य नेता पदच नाही

कपिल सिब्बल यांनी सर्वोच्च न्यायालयात जोरदार युक्तिवाद केला. यावेळी सर्वोच्च न्यायालयाने मुख्यनेता हे पद घटनेत आहे का? असा सवाल सिब्बल यांना केला. 2018 सालच्या घटनेनुसार शिंदे यांना मुख्यनेता करण्यात आलं. याची माहिती निवडणूक आयोगाला देण्यात आली होती का? असा दुसरा प्रश्न सिब्बल यांना कोर्टाने विचारला. याचे उत्तर सिब्बल यांनी थेट नाही असे दिले. पक्षाच्या घटनेत मुख्य नेता पदच नाही, असं थेट सांगितलं. या पदाबात पक्षाच्या घटनेत तशी तरतूद नसल्याचेही सिब्बल यांनी सांगितले. मुख्यनेता पद हे एकनाथ शिंदे यांनी तयार केले, असाही युक्तिवाद सिब्बल यांनी केला. 2018 सालच्या घटनेनुसार या पदाबाबत निर्णय घेण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.

शिंदे गटाला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न

दरम्यान, शिंदे यांच्यासह काही आमदारांनी बंडखोरी केल्यानंतर शिंदे यांना पक्षाचे मुख्यनेतेपद देण्यात आले होते. यावरच कोर्टात ठाकरे गटाने शिंदे गटाला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला. न्यायालयाने हा युक्तिवाद ग्राह्य धरला तर शिंदे गटाची अडचण होऊ शकते. त्यामुळे आता शिंदे गट सिब्बल यांच्या युक्तिवादावर नेमकी काय बाजू मांडणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. मुख्यनेतेपद रेकॉर्डवर नाही, असं मत ठाकरे गटाचं आहे तर हे पद नियमानुसार असून त्यानुसारच ही नियुक्ती करण्यात आली आहे, असे शिंदे गटाला सिद्ध करावे लागेल.

Follow Us
रस्ते आहेत, अपघात होणारच; बालकाच्या मृत्यूनंतर नेत्याचं धक्कदायक विधान
रस्ते आहेत तर अपघात होणारच; भोरमधील बालकाच्या मृत्यूनंतर शंकर मांडेकरांच्या विधानाने खळबळ
मुंबईकरांनो सावधान! 4 हजारहुन अधिक... मलेरिया, डेंग्यू, लेप्टोस्पायरोस
मुंबईकरांनो सावधान! 4 हजारहुन अधिक... मलेरिया, डेंग्यू, लेप्टोस्पायरोसिस रुग्णसंख्येत चिंताजनक वाढ
अध्यक्षांच्या गोंधळलेल्या भूमिकेमुळे... सुनावणीनंतर ठाकरे गटातील...
अध्यक्षांच्या गोंधळलेल्या भूमिकेमुळे... सुनावणीनंतर ठाकरे गटातील बड्या नेत्याची सुचक प्रतिक्रिया
शिवसेना कुणाची? आजची सुनावणी संपली, उद्या पुन्हा कपिल सिब्बल...
शिवसेना कुणाची? आजची सुनावणी संपली, उद्या पुन्हा कपिल सिब्बल... नेमकं काय घडणार?
ज्या घटनेनुसार आमदार, मंत्री झाले, त्याच घटनेवर प्रश्नचिन्ह उपस्थित
ज्या घटनेनुसार आमदार, मंत्री झाले, त्याच घटनेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करता - कपिल सिब्बल
ठाकरेंची शिंदेंना सर्व पदं...कपिल सिब्बल यांचा कोर्टात 'सुप्रीम'...
ठाकरेंची शिंदेंना सर्व पदं...कपिल सिब्बल यांचा कोर्टात 'सुप्रीम' युक्तिवाद; सुनावणीत काय दाखला दिला?
ठाकरेंची शिवसेना हाच राजकीय पक्ष, सिब्बल यांचा कोर्टात सर्वात मोठा...
ठाकरेंची शिवसेना हाच राजकीय पक्ष, सिब्बल यांचा कोर्टात सर्वात मोठा युक्तिवाद!
शिवसेना पक्ष, चिन्ह सुनावणीत मोठा ट्वीस्ट, निवडणुक आयोगाने...
शिवसेना पक्ष, चिन्ह सुनावणीत मोठा ट्वीस्ट, आमदारांच्या अपात्रतेची वाट पाहयला... कोर्टात नेमका युक्तीवाद काय?
मी आमदारांच्या अपात्रतेबाबत... शिवसेना पक्ष, चिन्ह सुनावणीत...
मी आमदारांच्या अपात्रतेबाबत... शिवसेना पक्ष, चिन्ह सुनावणीच्या सुरुवातीलाच कपिल सिब्बल यांनी मांडला महत्त्वाचा मुद्दा
फडणवीसांना दिल्लीत... CM देवेंद्र फडणवीसांच्या केंद्रात जाण्याबाबत...
फडणवीसांना दिल्लीत... CM देवेंद्र फडणवीसांच्या केंद्रात जाण्याबाबत अमृता फडणवीसांच सर्वात मोठं विधान