कोकणात पावसाचे धुमशान, जनजीवन विस्कळीत, मुंबई-गोवा महामार्ग ठप्प

कोकणातील रायगड, रत्नागिरीमध्ये मुसळधार पाऊस सुरु आहे. या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. पुलांवर पाणी आल्यामुळे काही गावांसोबत संपर्क तुटला आहे. रायगडमध्ये शाळा, महाविद्यालयांना सुट्टी देण्यात आली आहे. मुंबई-गोवा महामार्गावर पाणी साचल्यामुळे वाहतुकीची कोंडी निर्माण झाली आहे.

| Updated on: Jul 15, 2025 | 12:18 PM
1 / 6
रत्नागिरी जिल्ह्यात सध्या पावसाची संततधार सुरू आहे. लांजा तालुक्याला देखील मुसळधार पावसाने झोडपून काढले आहे. काजळी नदीच्या पाणीपातळीत वाढ झाल्याने लांजा तालुक्यातील अंजणारी येथील प्रसिद्ध दत्त मंदिर पाण्याखाली गेले आहे. दत्त मंदिराला पुराच्या पाण्याचा वेढा पडला आहे.

2 / 6
रत्नागिरी जिल्ह्यात पावसाची धुवांधार बॅटींग सुरु आहे. रत्नागिरी तालुक्यातील बाव नदीने रौद्ररूप धारण केले आहे. बाव नदीचे पाणी पात्र बाहेर आले आहे. नदीचे पाणी परचुरी पुलाला देखील लागले आहे.

3 / 6
रायगड जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरु आहे. यामुळे माणगाव, तळा, रोहा, पाली, महाड आणि पोलादपूर या सहा तालुक्यांतील सर्व शाळा आणि महाविद्यालयांना १५ जुलै रोजी एक दिवसाची सुट्टी जाहीर केली आहे.

4 / 6
मुंबई-गोवा महामार्गावर असलेल्या कशेडी घाटात दरड कोसळली आहे. त्यामुळे वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे. रस्त्यावरील दरड हटवण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू करण्यात आले आहे. परंतु पावसाचा व्यत्यय येत आहे.

5 / 6
मुंबई-गोवा महामार्गावर मोठ्या प्रमाणावर खड्डे निर्माण झाले आहे. कोकणात सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे या खड्ड्यांमध्ये पाणी साचले आहे. त्यामुळे वाहतूक कोंडी झाली आहे. महामार्गावर वाहनांच्या मोठ्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत.

6 / 6
रायगडमधील म्हसळा तालुक्यातील पुलावर पाणी आले आहे. यामुळे पाच गावांचा संपर्क तुटला आहे. पुलावरील पाणी कमी होण्याची वाट पाहत वाहनधारक थांबले आहेत. त्यामुळे म्हसळा येथील पुलावर दोन्ही बाजूने वाहतूक कोंडी झाली आहे.