
मराठी मनोरंजनसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री म्हणून हेमांगी कवीला ओळखले जाते. ती कायमच तिच्या पोस्टमुळे चर्चेत असते. आता नुकतंच हेमांगी कवीने एक कारनामा केला आहे. त्याचे काही फोटो तिने सोशल मीडियावर शेअर करत त्याबद्दल सविस्तर पोस्ट लिहिली आहे.

हेमांगी कवीने SUV ची Hyundai Creta ही नवीन कार खरेदी केली आहे. तिने ही कार गेल्यावर्षी खरेदी केली असली तरी त्या कारचे फोटो तिने पहिल्यांदाच शेअर केले आहे. हे फोटो शेअर करत तिने चाहत्यांना गुडन्यूज दिली आहे.

शेवटी घेतलीच असे कॅप्शन लिहित तिने हे caption सुचवलं आमच्या hyundai च्या car dealer @rideramitssalunke यांनी सुचवल्याचे हेमांगीने म्हटले आहे. मला तिने हेच caption द्या Madam! असे सांगितले आणि त्यावर मी आणि आमचा माणूस जोरात हसलो. आजही हे type करताना मी हसतेच आहे, असे हेमांगी कवी म्हणाली.

हेमांगीने गाडी खरेदी केल्यानंतर मालाडच्या शोरूममध्ये छोटी पूजा केली होती. त्यानंतर, तिने आपल्या आवडत्या ठिकाणच्या – दादरच्या शिवाजी पार्क येथील 'उद्यान गणेश' मंदिरात नेऊन गाडीची व्यवस्थित पूजा केल्याचे तिने सांगितले.

इतकंच नाही, तर ती ही नवीन कार गावी घेऊन गेली. तिथे तिने आई, काका, चुलत भाऊ आणि वहिनी यांच्या हस्तेही पूजा केली. आज तिच्या गाडीला एक वर्ष पूर्ण झाल्यानिमित्ताने तिने खास पोस्ट केली आहे.

हेमांगी आपल्या नव्या गाडीला प्रेमाने Beta Creta असे म्हणते. याआधी हेमांगीने एक हॅचबॅक आणि एक सेडान अशा दोन गाड्या वापरल्या आहेत. खूप दिवसांपासून SUV घेण्याची तिची इच्छा होती, जी या Beta Creta च्या रूपात पूर्ण झाली, अशी माहिती हेमांगीने दिली.

हेमांगी कवीच्या या पोस्टमुळे तिच्या चाहत्यांनी तिचे अभिनंदन केले आहे. तिने नेहमीप्रमाणेच आपल्या खास शैलीत तिचा हा आनंद साजरा केला आहे. दरम्यान हेमांगी कवी सध्या हिंदी टेलिव्हिजनवर महत्त्वाच्या भूमिकेत दिसत आहे. कैसे मुझे तुम मिल गये या मालिकेत ती भवानी चिटणीस ही नायिकेच्या आईची व्यक्तिरेखा साकारत आहे.

टीव्ही मालिकांसोबतच हेमांगी कवी रंगभूमीवरही कार्यरत आहे. सध्या ती जन्मवारी या नाटकात कार्यरत आहे. ती या नाटकाचे दौरे करत असून, एकाच वेळी मालिका आणि नाटकाचे काम सांभाळत आहे.