
'ये रिश्ता क्या कहलाता है' या मालिकेतून अभिनेत्री शिवांगी जोशी घराघरात पोहोचली. शिवांगीचा जन्म 18 मे 1998 रोजी महाराष्ट्रातील पुण्यात झाला. 27 वर्षीय शिवांगीने बालकलाकार म्हणूनही काम केलंय. टेलिव्हिजनवरील नामांकित मालिकांमध्ये तिने भूमिका साकारल्या आहेत.

'ये रिश्ता क्या कहलाता है', 'बडे अच्छे लगते है 4', 'बरसातें- मौसम प्यार का', 'बालिका वधू 2' आणि 'बेगुसराय' यांसारख्या मालिकांमध्ये भूमिका शिवांगीने आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. कमी वयात तिने मोठं नाव कमावलं आहे.

शिवांगी जोशी ही टेलिव्हिजनवरील फक्त लोकप्रिय अभिनेत्री नाही, तर ती सर्वांत महागडी अभिनेत्रीसुद्धा आहे. एका एपिसोडसाठी ती जवळपास दीड ते दोन लाख रुपये मानधन स्वीकारते. रुपाली गांगुलीनंतर शिवांगी जोशी सर्वाधिक फी स्वीकारते.

शिवांगीचं नाव 'बालिका वधू 2' या मालिकेतील सहकलाकार रणदीप रायशीही जोडलं गेलं होतं. परंतु नंतर या चर्चा फक्त अफवा असल्याचं स्पष्ट झालं होतं. शिवांगी आणि रणदीपनेही त्यांच्या अफेअरच्या चर्चा नाकारल्या होत्या.

शिवांगीने 'ये रिश्ता क्या कहलाता है' या मालिकेतील सहकलाकार मोहसिन खानला डेट केलंय. 2017 मध्ये या दोघांनी एकमेकांना डेट करण्यास सुरुवात केली होती. परंतु 2020 मध्येच त्यांचा ब्रेकअप झाला. मालिकेतील या जोडीला प्रेक्षकांकडून भरभरून प्रेम मिळालं.

मोहसिनशी ब्रेकअपनंतर शिवांगी प्रसिद्ध अभिनेता कुशल टंडनला डेट करत होती. कुशल हा शिवांगीपेक्षा 13 वर्षांनी मोठा आहे. 'बरसातें- मौसम प्यार का' या मालिकेच्या सेटवर दोघांची पहिल्यांदा भेट झाली होती. त्यानंतर दोघं एकमेकांच्या प्रेमात पडले होते. परंतु या दोघांचंही नातं फार काळ टिकू शकलं नाही.