
हिंदू पंचांगानुसार, होळीचा सण फाल्गुन महिन्याच्या पौर्णिमेला साजरा केला जातो. यंदा होळी येत्या 25 मार्च रोजी सोमवारी साजरी केली जाईल आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच 24 मार्च रोजी रविवारी रंगपंचमी खेळली जाईल. होळी या शुभ सणाच्या आधी घरातून काही गोष्टी बाहेर काढल्यास आर्थिक तंगीतून मुक्ती होऊ शकते, असं म्हणतात. घरातील अशुभ गोष्टींना होलाष्टकच्या दिवशीच घराबाहेर काढल्या पाहिजेत, असं सांगितलं जातं. या अशुभ गोष्टी कोणत्या आहेत, ते जाणून घेऊयात..

घरात तुटलेल्या-फुटलेल्या किंवा खंडित मूर्त्या ठेवणं अत्यंत अशुभ मानलं जातं. जर तुमच्या घरातील मंदिरात कोणतीही खंडित प्रतिमा असेल तर त्वरित ती घराबाहेर काढा. तुटलेल्या-फुटलेल्या आणि खंडित मुर्त्यांमुळे घरात नकारात्मकता पसरते, असं मानलं जातं.

घरात बिघडलेलं घड्याळ ठेवणंही अशुभ मानलं जातं. बंद पडलेलं, बिघडलेलं घड्याळ म्हणजे वाईट वेळाचा संकेत मानला जातो. म्हणूनच बंद पडलेलं घड्याळ दुरुस्त करून घ्यावं किंवा दुरुस्त करण्यासारखं नसेल तर ते टाकून द्यावं.

फाटलेले शूज किंवा चप्पल यांमुळेही घरात नकारात्मकता आणि दुर्भाग्य येते असं म्हटलं जातं. यामुळे धनाचीही कमतरता निर्माण होते, असं मानलं जातं. त्यामुळे खराब झालेले किंवा फाटलेले चप्पल, शूज काढून टाकावेत.

घरात तुटलेला आरसा किंवा तुटलेल्या काचेची कोणतीही वस्तू ठेवणं अशुभ मानलं जातं. त्यामुळे होळीच्या आधी अशा गोष्टी घराबाहेर काढणं योग्य असतं.