Holi 2026: भारताशिवाय आणखी कोणत्या देशात रंगाचा उत्सव साजरा होतो

Holi 2026: होळी नंतर येणारा रंगपंचमीचा सण केवळ भारताच नव्हे तर अन्य काही देशातही साजरा केला जातो.चला ते कोणते देश हे जाणून घेऊयात...

| Updated on: Feb 22, 2026 | 11:04 PM
1 / 6
 नेपाळमध्ये फागू पूर्णिमेच्या रुपात हा सण साजरा केला जातो. भारतानंतर या देशात होळी-रंगपंचमीचा सण साजरा केला जातो. या सण दोन दिवस सुरु असतो. पहिला दिवस डोंगराळ भागात तर दुसरा दिवस मैदानी भागात साजरा केला जातो.

नेपाळमध्ये फागू पूर्णिमेच्या रुपात हा सण साजरा केला जातो. भारतानंतर या देशात होळी-रंगपंचमीचा सण साजरा केला जातो. या सण दोन दिवस सुरु असतो. पहिला दिवस डोंगराळ भागात तर दुसरा दिवस मैदानी भागात साजरा केला जातो.

2 / 6

बांगलादेशात होळी डोल पुर्णिमा वा बसंत उत्सव म्हणून साजरी होते. येथील हिंदू कुटुंबात हा सण साजरा होता. याच प्रकारे पाकिस्तानातील सिंध प्रांतातही हिंदू कुटुंबे होळी-रंगाचा सण खेळतात. हिंदू लोक मंदिरात जातात आणि होळी साजरी करतात. अल्पसंख्याक असूनही हिंदू लोक येथे होळीचा सण बिनधास्त साजरा करतात.

3 / 6

मॉरीशसमध्ये भारतीय लोकांची संख्या जास्त आहे. त्यामुळे येथे होळीला सार्वजनिक सुट्टी दिली जाते. होलिका दहन होते. आणि संपूर्ण बेटावर पारंपारिक फाल्गुण मासाची गाणी म्हटली जातात. फिजीतही या सणाला पगुआ नावाने ओळखले जाते.

4 / 6

गिआना, सूरीनाम आणि त्रिनिदाद आणि टोबॅगोतही होळी साजरी केली जाते. होळीचे लोकप्रिय रुपात येथे फगवा म्हटले जाते. या सणात पारंपारिक चौताल गाणी गाणे आणि होलिका दहनाची पारंपारिक पूजा केली जाते.

5 / 6

संयुक्त राज्य अमेरिकेतही भारतीय लोक होळी साजरी करतात. युटाच्या स्पेनिश फोर्कमध्ये हरे कृष्ण मंदिरात हा सण होतो. न्यूयॉर्क शहरात कलर रन आणि परेड होते. युनायटेड किंग्डममध्ये लंडन, लिसेस्टर आणि बर्मिंघम सारख्या शहरात भारतीय संगीत आणि डान्स आणि रंगाचा हा सण साजरा केला जातो

6 / 6

ऑस्ट्रेलिया खासकरुन ऑस्ट्रेलियातील सिडनी, मेलबर्न आणि साऊथ आफ्रीकेत डरबन आणि जोहान्सबर्ग सारख्या शहरात तेथील भारतीय हा सण साजरा करतात.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us