AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

2 तास 14 मिनिटांचा तो सर्वात भयानक हॉरर चित्रपट, अवघ्या ५ दिवसांत कमावले २८५ कोटी, चुकूनही एकटे पाहू नका

सध्या सगळीकडे एका चित्रपटाची चांगलीच चर्चा रंगली आहे. या हॉरर चित्रपटाने सर्वांना हादरुन टाकले आहे. हा चित्रपट एकट्याने पाहताना अनेकांना भीती वाटली आहे. आता हा चित्रपट कोणता आहे जाणून घ्या...

| Updated on: Apr 21, 2026 | 1:23 PM
Share
गेल्या काही दिवसांमध्ये हॉरर चित्रपटांची क्रेझ वाढताना दिसत आहे. अनेकजण सतत नवनवीन हॉरर सिनेमे शोधताना दिसत आहे. वर्ष 2026 मध्ये हॉलिवूडमध्ये देखील पुन्हा एकदा भीती आणि रहस्याने भरलेल्या चित्रपटांचा ट्रेंड पाहायला मिळत आहे. यावेळी निर्मात्यांनी प्राचीन संस्कृती, शाप आणि अंधश्रद्धा यांसारख्या गोष्टींची आधुनिक हॉररशी सांगड घातली आहे. प्रेक्षकांना अशा कथा आवडतात ज्यात केवळ भीती नाही, तर एक भक्कम कथानक देखील असते. विशेष म्हणजे, या चित्रपटांमध्ये मोठ्या बजेटऐवजी वातावरण, सस्पेन्स आणि व्हिज्युअल्सवर अधिक लक्ष केंद्रित करण्यात आले. याच कारणामुळे कमी खर्चातही हे चित्रपट अधिक प्रभावी आणि मनोरंजक ठरले असून प्रेक्षकांना शेवटपर्यंत खिळवून ठेवण्यात यशस्वी होत आहेत.

1 / 5
एप्रिल 2026 हा महिना हॉरर आशय आवडणाऱ्यांसाठी खूप खास आहे. या महिन्यात या वर्षातील काही खास हॉरर चित्रपट प्रदर्शित झाले, ज्याची चाहते दीर्घकाळापासून वाट पाहत होते. या चित्रपटांमध्ये हॉरर, थ्रिलर आणि कॉमेडीचा अप्रतिम मेळ पाहायला मिळत आहे. जिथे भारतात हॉरर-कॉमेडीचा ट्रेंड लोकांना खूप आवडत आहे, तिथेच हॉलिवूडचे भितीदायक चित्रपट देखील प्रेक्षकांना थिएटरकडे आकर्षित करत आहेत. असाच एक चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई करत आहे, ज्याने अक्षय कुमारच्या हॉरर-कॉमेडी चित्रपटालाही मागे टाकले आहे.

2 / 5
या चित्रपटाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे, हॉलिवूडमधील सर्वात भयानक चित्रपट ‘इविल डेड राइज’चे दिग्दर्शक ली क्रोनिन यांनी ‘द कॉन्ज्युरिंग’च्या दिग्दर्शकासोबत मिळून याची निर्मिती केली आहे. हा चित्रपट 17 एप्रिल 2026 रोजी जगभरात प्रदर्शित झाला. या चित्रपटाचे नाव ‘ली क्रोनिन'स द मम्मी’ (Lee Cronin's The Mummy) असे आहे. दरम्यान, हा चित्रपट जुन्या 'मम्मी' चित्रपटांच्या मालिकेचा भाग नसून, एक नवीन आणि गडद (Dark) कथा म्हणून तयार करण्यात आला आहे. प्रदर्शित होताच या चित्रपटाने आपल्या वेगळ्या शैलीमुळे आणि भीतीदायक वातावरणामुळे लोकांचे लक्ष वेधून घेतले आहे.

3 / 5
कथेबद्दल बोलायचे झाले तर, ही एका कुटुंबाभोवती फिरते, ज्यांची मुलगी अनेक वर्षांपूर्वी अचानक गायब होते. जेव्हा ती बऱ्याच काळानंतर परतते, तेव्हा तिचे वागणे सामान्य नसते. हळूहळू समजते की तिच्यावर एका प्राचीन इजिप्शियन शापाचा प्रभाव आहे. कथेत पिरॅमिड, ममीफिकेशन आणि प्राचीन सभ्यतेशी संबंधित अनेक भयानक रहस्ये समोर येतात. हा चित्रपट वेगवान ॲक्शनवर नाही, तर हळूहळू वाढत जाणारी भीती आणि वातावरणावर भर देतो. हीच गोष्ट याला इतर हॉरर चित्रपटांपेक्षा वेगळे आणि अधिक गंभीर बनवते.

4 / 5
चित्रपटात जॅक रेनर, लाइआ कोस्टा, मे कैलमावी आणि नताली ग्रेस यांसारखे कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. चित्रपटाचे बजेट आणि कमाई पाहिली तर, याचे बजेट सुमारे २२ दशलक्ष डॉलर्स म्हणजेच जवळपास १८० कोटी रुपये असल्याचे सांगितले जाते. प्रदर्शनाच्या सुरुवातीच्या दिवसांतच या चित्रपटाने सुमारे ३४ दशलक्ष डॉलर्स म्हणजेच सुमारे २८० कोटी रुपयांची कमाई केली आहे. भारतात या चित्रपटाची टक्कर अक्षय कुमारच्या ‘भूत बंगला’ या चित्रपटाशी होत आहे. प्रेक्षक या चित्रपटालाही पसंती देत आहेत, पण त्याचसोबत ‘ली क्रोनिन'स द मम्मी’ बाबतची त्यांची उत्सुकता झपाट्याने वाढत आहे.

5 / 5
Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...